आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तणावमुक्त रहायचे असेल तर सोपा उपय करा.. केमिकल लोचा होणार नाही..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 लंडन- तणावापासून चार हात लांब राहायचे असेल तर आपण आपल्या शब्दकोशातून तणाव शब्दच काढून टाकला पाहिजे, असा मौलिक सल्ला ब्रिटिश शास्त्रज्ञांनी दिला आहे. मी तणावात अाहे असे कोणत्याही व्यक्तीने म्हणू नये. कारण या कृतीमुळे तुमची प्रकृती आणखी बिघडू शकते. तणाव म्हणताच शरीरात काही रसायने स्रवत असल्याचे अभ्यासात दिसून आले.
 
संशोधक क्लिनिकल सायकोथेरपिस्ट सेठ स्विरस्काय यांच्या म्हणण्यानुसार, तणाव शब्द तुमच्या आयुष्यावर मोठा परिणाम करू शकतो. तणाव शब्दाचा उच्चार करताच शरीरात अॅपीनेफ्रिन व कोर्टिसोल रसायनांचा स्तर वाढतो. यासोबत मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर्स तुम्हाला जास्त तणावाची जाणीव करून देतात. यादरम्यान हृदयाची धडधड वाढते, श्वासोच्छ्वास वेगाने होतो. रक्तदाबही वाढतो. यामुळे रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते. विचारप्रक्रिया खंडित होते, भीती आणि चिंता वाढते. त्यामुळे तणाव कमी करण्यासाठी भाषा आणि विचारात सुधारणा करायला हवी. असे काही जाणवू लागताच वाचन, स्वसंवाद व व्हिजन बोर्ड तयार करावे किंवा आवडीच्या कामात गुंतून घ्यावे.
 
डॉ. प्रतिमा रायचूर म्हणाल्या, हा शब्द डाेक्यातून काढून टाकायला हवा. ध्यान व व्यायामातून ते शक्य आहे. त्यासाठी आपल्या सवयी ओळखल्या पाहिजेत. दररोज सकारात्मक विचार करायला हवा. नुकत्याच झालेल्या संशोधनात तणावाचे काम हसतमुखाने स्वीकारल्यास हृदयाचे ठोके व कोर्टिसोल स्तर कमी होत असल्याचे समोर आले आहे.
 
भारतात ४६ % कर्मचारी तणावात, जास्त आत्महत्येचे कारणही हेच
एका संशोधनानुसार,भारतात सुमारे ४६ % सरकारी कर्मचारी तणावाच्या ओझ्याखाली काम करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक आत्महत्या तणावामुळे होतात. जगात दर ४० सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. भारतात दरवर्षी सुमारे एक लाख व्यक्ती आत्महत्या करतात. जगात गेल्या पाच वर्षांत तरुणांत २ ते १२ % तणाव वाढला. ७७ % व्यक्ती प्रेमसंबंधातील तणावावरून तणावात असतात.
बातम्या आणखी आहेत...