आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीसाठी पाच दिवसांत शोधली B.A. PASS सून, असा करत आहे प्रचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मवीर यांनी महिला राखीव जागेवर निवडणूक लढण्यासाठी  बी.ए.पास ज्योतीला घरात सून म्हणून आणले. - Divya Marathi
धर्मवीर यांनी महिला राखीव जागेवर निवडणूक लढण्यासाठी बी.ए.पास ज्योतीला घरात सून म्हणून आणले.
पानीपत - गावातील सरपंचपदासाठी लोक आता नव-नव्या क्लृप्त्या लढवताना दिसत आहेत. कोणी घाई-घाईत मुलाचे लग्न लावून देत आहे तर काहींनी नियमांच्या चौकटीत फिट बसण्यासाठी मेहुण्याला घटस्फोट घ्यायला लावून त्याच्या पत्नीसोबत स्वतः लग्न करत आहेत. सध्या हरियाणात अशा मनोरंजक घडामोडी पाहायला मिळत आहेत.

जागा महिला राखीव होती, पाच दिवसांत मुलाचे लग्न लावून घरात आणली सून
- एका गावात धर्मवीर यांना सरपंचपदाची निवडणूक लढण्याची इच्छा होती, पण जागा महिलांसाठी आरक्षीत झाली.
- स्वतःला सरपंच होता येत नाही, पण पद घरातच असले पाहिजे, या इच्छेमुळे धर्मवीर यांनी बी.ए.चे शिक्षण घेत असलेल्या मुलाचे घाई-गडबडीत पाच दिवसांत बी.ए. पास ज्योतीसोबत लग्न लावून महिला उमेदवार घरात आणली.
- घरात सून आली आणि निवडणूक लढण्यासाठी सगेसोयरेही पुढे सरसावले. त्यांनी निवडणुकीतील खर्चासाठी दोन लाख रुपयेही दिले, असे धर्मवीर सांगतात.
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अशा रंजक बातम्या समोर येत आहेत.

काय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय
- हरियाणातील पंचायत निवडणुकी संदर्भात सुप्रीम कोर्टाने नुकताच महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार, निवडणूक लढण्यासाठी आता सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार किमान 10 वी आणि मगासवर्गिय प्रवर्गातील उमदेवार किमान आठवी पास असणे गरजेचे आहे. या निर्णयानंतर हरियाणाच्या गावागावात महिला राखीव जागांवर सरपंच पदाची इच्छा असलेल्या कुटुंबाकडून शिक्षित महिलांचा शोध सुरु झाला आहे.
निवडणूकीसाठी आणखी काय कल्पना लढवत आहेत 'सरपंच'
- ज्यांना सरपंच होण्याची इच्छा आहे पण त्यांची पत्नी शिक्षित नाही असे लोक आता दुसरे लग्न करत आहेत.
- सरपंचपदासाठी काही लोक केवळ कागदोपत्री लग्न करत आहेत.
- काही महाभाग तर नात्यातील लोकांचा घटस्फोट करुन त्यांच्या पत्नीसोबत विवाह करत आहेत.
- हुंड्यासाठी कुप्रसिद्ध काही भागात या निर्णयामुळे घाई-घाईत साध्या पद्धतीने लग्न होत आहेत.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटोज्..