आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्‍तीनीने मगरीच्या जबड्यातून पिल्लास खेचून आणले, पाहा PHOTOS...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिम्बाब्वेतील छायाचित्रकार फ्रान्स्वा बोर्मन झांबेजी व्हॅलीमध्ये गेले होते. तेथील माना तलावाजवळ ते गेले. त्यांनी तेथे पाहिले, एक हत्तीचा कळप तलावाच्या पाण्यात उतरला होता. त्यांच्यामध्ये एक छोटेसे पिल्लूही होते. पिल्लाने पाण्यात सोंड घातल्यानंतर मगरीने त्याची सोंड आपल्या जबड्यात दाबून धरली. मगर त्याला पाण्यात खेचणारच होती, पण हत्तीने त्याला स्वत:कडे खेचून घेतले. दुसरीकडे हत्तिणीने सोंडेने मगरीला असा तडाखा दिला की, मगरीला पिल्लाला सोडणे भाग पडले. हे दृश्य बोर्मनने चित्रात बंदिस्त केले. त्यांनी द पॉझिटिव्हच्या फेसबुक पेजवर ही छायाचित्रे अपलोड केली आहेत. त्या हत्तिणीने आपल्या पिल्लास मगरीच्या दाढेतून वाचवले, हे छायाचित्रावरून दिसून येते.

बोर्मनच्या मते, आफ्रिकी नॅशनल पार्क किंवा व्हॅलीत अशी दृश्ये दुर्मिळ असतात. वाइल्डलाइफ छायाचित्रकारांना खूप काळ अशा छायाचित्रासाठी वाट पाहावी लागते. मला असे दृश्य चित्रित करण्यास मिळाले, या दृष्टीने मी भाग्यवान ठरलो. या तलावामध्ये पाणी होते; पण किनाऱ्यावर चिखल होता. हत्तींना थोडा वेळ लागला असता तर पिल्लाला जीव गमावावा लागला असता.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...