आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मुलीचा ३ महिन्यात दोनवेळा जन्म, ऑपरेशनसाठी २२ व्या आठवड्यात गर्भातून काढले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेक्सास येथे राहाणाऱ्या मार्गरेट बूमर १६ व्या आठवड्यातील नियमीत अल्ट्रासाऊंडड चेकिंगसाठी गेल्या होत्या. - Divya Marathi
टेक्सास येथे राहाणाऱ्या मार्गरेट बूमर १६ व्या आठवड्यातील नियमीत अल्ट्रासाऊंडड चेकिंगसाठी गेल्या होत्या.
इंटरनॅशनल डेस्क - अमेरिकेतील टेक्सास प्रांतात एका मुलीचा तीन महिन्यात दोनवेळा जन्म झाला आहे. झाले असे, की बाळ आईच्या गर्भात वाढत असताना त्यासोबतच एक ट्यूमर वाढत हाते. ते काढण्यासाठी बाळाला २२ व्या आठवड्यात गर्भातून काढण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाला पुन्हा गर्भात ठेवले आणि ३६ व्या आठवड्यात डिलिव्हरी केली.
बाळाच्या रक्तावर वाढत होते ट्यूमर
- टेक्सास येथे राहाणाऱ्या मार्गेरेट बूमर १६ व्या आठवड्यातील नियमीत अल्ट्रासाऊंडड चेकिंगसाठी गेल्या होत्या.
- त्यावेळी कळाले की बाळाच्या शरीरालालगत एक ट्यूमर वाढत आहे. त्याला वैद्यकीय भाषेत सेक्रोकेक्सीजियल टेराटोमा म्हटले जाते.
- २३ व्या आठवड्यातील तपासणीत परिस्थिती आणखी वाईट झालेली होती. ट्यूमर बाळाच्या ह्रदयावर दबाव निर्माण करीत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. यामुळे गर्भातील बाळाचे ह्रद्य बंद पडण्याची शक्यता होती.
- चिल्ड्रन फिटल सेंटरचे डॉ. डारेल कास म्हणाले होते, की ट्यूमर वेगाने वाढत आहे. बाळाच्या जन्माआधी ते काढणे गरजेचे आहे.
पुन्हा गर्भात ठेवले गेले बाळ
- डॉक्टरांकडे आता फार कमी वेळ राहिला होता. बाळाला लवकरात लवकर ट्यूमरपासून वेगळे करणे गरजेचे होते. अन्यथा बाळाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती.
- जर ट्यूमरने बाळाच्या शरीरातील अधिक रक्त घेतले असते तर बाळाचा हार्टअटॅकने मृत्यू ओढवू शकला असता. डॉक्टरांनी ऑपरेशनची तयारी केली.
- ऑपरेशनदरम्यान डॉक्टरांना लक्षात आले की बाळाला गर्भाशयातून काढल्याशिवाय ट्यूमर काढणे कठिण आहे.
- साधारण पाच तास चाललेल्या ऑपरेशनदरम्यान २३ आठवड्यांच्या बाळाला ट्यूमरसह गर्भातून बाहेर काढण्यात आले.
- ट्यूमर वेगळे करुन बाळाला पुन्हा गर्भाशयात ठेवण्यात आले. त्यानंतर १२ आठवडे बाळाची गर्भात वाढ झाली.
- ३६ आठवडे पूर्ण झाल्यानंतर ६ जून २०१६ ला ऑपरेशन करुन मार्गेरेटची डिलिव्हरी करण्यात आली. आता बाळ-बाळांतीण दोघीही सुखरुप आहेत.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...