आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुद्रात वाहून गेली 10 महिन्यांची मुलगी,कोस्‍टगार्डने वाचवले प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
समुद्रात फलोटेशन टॉयवर तरंगत वाहूनजातांना 10 महिन्‍याची मेल्‍डा - Divya Marathi
समुद्रात फलोटेशन टॉयवर तरंगत वाहूनजातांना 10 महिन्‍याची मेल्‍डा
( समुद्रात प्‍लोटेशन टॉयवर तरंगत वाहूनजातांना 10 महिन्‍याची मेल्‍डा  )
इस्‍तांबूल-तुर्कीमधील कॅनाकेल बीचवर एक परिवार आपली 10 महिन्‍याची मुलगी मेल्‍डासह  फिरायला आले होते.बीचवर सनबाथ घेण्‍याच्‍या नादात मुलगी फलोटेशन टॉयवर तरंगत समुद्रात दुरपर्यंत गेली. परंतु कोस्‍टागार्डच्‍या टीमने मुलीचे प्राण वाचवले. 
 
मेल्‍डा  हवेच्‍या दाबाने समुद्रात वेगाने वाहून जात होती, ती ग्रीक आयर्लंड लेस्‍बोसच्‍या दिशेने जवळपास एक किलोमीटरपर्यंत पोहोचली होती. तोपर्यंत ति‍च्‍या कुटुंबाच लक्ष ति‍च्‍याकडे नव्‍हते. परंतु, बीचवरील काही लोकांची नजर समुद्रात तरंगत जाणा-या प्‍लोटेशन टॉयवर पडली. त्‍यावर एक लहान मुलगी वाहून जात असल्‍याचे कळताच त्‍यांनी मुलीला वाचवण्‍याचा प्रयत्‍न केला तोपर्यंत मुलगी समुद्रात दुरपर्यंत वाहून गेली होती. त्‍यांनी तात्‍काळ या घटनेची माहिती कोस्‍टगार्डला दिली कोस्‍टगार्डच्‍या टीमने समुद्रात वाहत जाणा-या मेल्‍डाचा पाठलाग करून तीला कुटुंबाच्‍या हवाली केले.
 
तुर्कीच्‍या बीजीएन न्‍यूजच्‍या माहितीनुसार, मेल्‍डाला प्‍लोटेशन टॉयवर झोपवलेली होती हे ति‍च्‍या  आई-वडिलांना लक्षात राहिलं नव्‍हतं .