आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BAE Systems Will Develop Next Generation Plane And Space Flights

मुंबईहून दिल्ली केवळ 11.63 मिनिटांत, ब्रिटिश कंपनी BAE हवाई वाहतुकीचा चेहरा बदलणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- येत्या दोन दशकांमध्ये हवाई वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ब्रिटिश हवाई वाहतूक कंपनी BAE सिस्टिम सध्या हायपरसॉनिक ट्रॅव्हलवर नियोजन करीत आहे. त्यासाठी ही कंपनी हवाई वाहतुकीतील क्रांतीकारी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनीत मोठी गुंतवणूक करणार आहे.
आवाजाचा पृथ्वीच्या वातावरणातील वेग तीन सेकंदात एक किलोमीटर असा आहे. या कंपनीची हायपरसॉनिक विमाने विकसित झाल्यावर त्यांची गती प्रति किलोमीटर 0.6 सेकंद अशी असेल. म्हणजेच मुंबई आणि दिल्लीतील हवाई अंतर 1 163 किलोमीटर आहे. या हायपरसॉनिक विमानाने जायचे म्हटल्यास तुम्हाला केवळ 697.8 सेकंदात म्हणजेच केवळ 11.63 मिनिटांत मुंबईहून दिल्लीला जाता येईल.
BAE ही कंपनी 20.6 मिलियन युरो ब्रिटनमधील इंजिनिअरिंग कंपनी रिअॅक्शन इंजिन या कंपनीत गुंतवणार आहे. या कंपनीतील 20 टक्के शेअर्स विकत घेऊन ही गुंतवणूक केली जाणार आहे. रिअॅक्शन इंजिनने एअरोस्पेस टेक्नॉलॉजीमध्ये क्रांतीकारक शोध लावल्याचा दावा केला आहे. याला SABRE टेक्नॉलॉजी असे नाव देण्यात आले आहे. या टेक्नॉलॉजीचा उपयोग करुन नवीन पिढीची अंतराळयाने आणि प्रवासी विमाने तयार केली जाऊ शकतात. याचा व्यावसायीक उपयोग BAE ही कंपनी करणार आहे.
BAE च्या वेबसाईटवर यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. SABRE टेक्नॉलॉजीमध्ये जेट आणि रॉकेट टेक्नॉलॉजीचा एकत्रित पद्धतशीरपणे वापर करण्यात आला आहे. याबाबत रिअॅक्शन इंजिनचे प्रधान संचालक मार्क थॉमस म्हणाले, की या नवीन टेक्नॉलॉजीने सध्याच्या व्यावसायीक विमानांप्रमाणे अंतराळयान पृथ्वीवर सहज लॅंडिंग आणि टेकऑफ करु शकतील. अंतराळात पाठविण्यासाठी भल्यामोठ्या अंतराळयानांची गरज भासणार नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, SABRE टेक्नॉलॉजी म्हणजे काय.... आवाजाच्या गतीपेक्षा पाच पटीने कशी उड्डाण करतील विमाने....