आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकची राजधानी बगदाद हादरली, आत्मघाती कार बॉम्बस्फोटात ३२ ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- नवीन वर्षाच्या जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर इराकची राजधानी बगदाद सोमवारी झालेल्या एका आत्मघातकी कार बॉम्बच्या स्फोटाने हादरली. दाट वस्तीत झालेल्या या आत्मघातकी स्फोटात एकूण ३२ जण ठार, तर डझनभर व्यक्ती जखमी झाल्याची माहिती पोलिस व रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. यातील बहुतांश लोक हे मजूर कामगार होते आणि ते शहराच्या बाजार भागात कामाच्या प्रतीक्षेत होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, ३२ जण ठार झाले, तर ६१ जण या स्फोटात जखमी झाले. हा बगदादमधील तीन दिवसांतच झालेला दुसरा मोठा हल्ला आहे. शनिवारीच झालेल्या एका दुहेरी धमाक्यात कमीत कमी २८ लोक ठार झाले होते. हा स्फोट देखील  मध्य बगदादमधील वर्दळीच्या बाजार भागातच झाला होता. या हल्ल्याची जबाबदारी अद्यापपर्यंत तरी कुठल्याही संघटनेने घेतल्याचे दिसले नाही. पण इस्लामिक स्टेट जिहादी ग्रुपने अशातच झालेल्या सर्वच हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली होती. त्यामुळे त्यांनाच गृहीत धरून संशयाची सुई त्यांच्यावरच आहे. अशा हल्ल्यात नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा सामान्य नागरिकांनाच लक्ष्य केले गेले आहे हे दिसते. या घटनेनंतर अनेकांनी छायाचित्र सोशल मिडियावर टाकली.
बातम्या आणखी आहेत...