आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baghdad Markets Truck Bomb Blast 76 Killed, 200 Injured

बगदादच्या बाजारपेठेमध्ये ट्रक बॉम्बस्फोटात ७६ ठार, २०० जण जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराकची राजधानी गुरुवारी बाँबस्फोटाने हादरली. बगदादच्या मुख्य बाजारपेठेत स्फोटकांनी भरलेला ट्रक उडवून देण्यात आला. त्यात ७६ जण ठार तर २०० जखमी झाले. ही घटना सकाळी घडली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले अनेक मृतदेह आढळून आले.
सद्र शहरातील जमीला बाजारपेठेत हा ट्रक घुसवण्यात आला होता. हा प्रदेश शियाबहुल आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. ही बाजारपेठ फळे आणि भाजीपाल्याची आहे. स्फोटानंतर सर्वत्र फळे आणि भाजीपाला पसरल्याचे दिसून आले. त्यानंतर अग्निशमन दलचे जवान तेथे दाखल झाले. गुरुवारचा आठवडी बाजार असल्यामुळे बाजारपेठेत मोठी गर्दी होती. त्याच वेळी हा स्फोट घडवण्यात आला. हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली आहे ; अतिरेक्यांनी लष्कराला लक्ष्य करण्याचा यातून प्रयत्न केला.आहे. ठोक मालाचा हा मोठा बाजार आहे.

एकतृतीयांश आयएसच्या ताब्यात
सुन्नी दहशतवादी संघटनेच्या ताब्यात सध्या देशाचा एकतृतीयांश भाग आहे. ते शिया तसेच इतर अल्पसंख्याक समुदायाला लक्ष्य करत असल्याचे दिसून आले आहे. संघटनेने अलीकडेच अनेक प्रदेशांवर वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे संघर्ष सुरू आहे.
सर्वात मोठा हल्ला
गेल्या काही वर्षांतील हा सर्वांत मोठा हल्ला आहे. देशात २००६-०७ पासून हिंसाचार सुरू आहे. तेव्हापासून एकाच हल्ल्यात एवढी प्राणहानी झाल्याची ही पहिलीच घटना असावी.
आयएसविरोधात अमेरिकेचा पहिला हवाई हल्ला
अंकारा इस्लामिक स्टेटची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी अमेरिकेने प्रयत्न सुरू केले आहेत. गुरुवारी तुर्कीतून सिरियातील आयएसच्या तळांवर हल्ले करण्यास सुरुवात झाली आहे. तुर्कीतील तळावरून आयएसला लक्ष्य करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेने मानवरहित विमानातून हल्ला केला होता. दहशतवादाच्या विरोधातील मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आहे. दक्षिणेकडील अडाना शहराजवळील हवाई तळावरून सिरियातील आयएसवर ही कारवाई केली. गेल्या महिन्यात तुर्कीने मित्र राष्ट्रांसाठी तळ खुले करण्याचे जाहीर केले होते.

चीन : टियानजिन शहरात स्फोट; ५० ठार, ७०० जखमी
टियानजिन | चीनचे बंदरावरील शहरात रासायनिक स्फोटात किमान ५० जण ठार तर ७०० जण जखमी झाल्याची घटना गुरूवारी उजेडात आली. आैद्योगिक क्षेत्रातील हा सर्वात मोठा होता. सुमारे १० हजार नागरिक स्थलांतरित झाले.