आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीचा उद्रेक; 3.4 किमी राखेचे वादळ, शेकडो फ्लाइट रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी डोंगर आगुंगमध्ये पुन्हा उद्रेक होत आहे. इंडोनेशियातील बाली येथे असलेल्या या डोंगरावर 3.4 किमी उंच राखेचे वादळ आग ओकत आहे. कुठल्याही क्षणी यातून लावारस बाहेर येऊ शकतो असा हायअलर्ट प्रशासनाने जारी केला. यासोबतच 7500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून बाली विमानतळ पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यामुळे, या विमानतळावरून जाणारे आणि त्यावर येणारे शेकडो फ्लाइट अनिश्चित काळासाठी रद्द झाल्या आहेत. 

 

> विमानतळ प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, एकूणच 445 विमान रद्द झाले असून त्याचा फटका 59000 पर्यटक आणि प्रवाश्यांना बसला आहे. 
> बाली पर्यटन स्थळ असल्याने अजुनही अनेक देशांचे नागरिक बालीत आहेत. अशात विविध देशांनी आप-आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. 
> प्रशासनाने सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, 1 लाख स्थानिकांनी सुरक्षित स्थळी पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र, वारंवार इशारा आणि सूचना देऊनही केवळ 40 हजार नागरिकांनी माउंट आगुंग परिसर सोडला आहे. 
> माउंट आगुंगच्या परिसरातील प्रत्येक गोष्ट राखेने माखली आहे. येथील रस्ते, झाड, घरे आणि झाडांच्या पानांवर सुद्धा धूळ आणि राख आहे. विमान प्रवास तर दूरच स्थानिकांनी वाहनांवर देखील फिरता येत नाही. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज....

बातम्या आणखी आहेत...