आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या बलूच एक्टिव्हिस्टने मोदींना दिल्या गुजरातीत रक्षाबंधनच्या शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलूचिस्तान- एका बलूच समाज सेविकेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत. करीमा बलोच असे या महिलेचे नाव आहे. विशेष म्हणजेे करीमा हिने मोदींंना गुजराती भाषेेत शुभेच्छा दिल्या आहेत. बलूचिस्तानचा बहुप्रतिक्षीत मुद्दा पुन्हा चर्चेत आणल्याबद्दल तिने मोदींंचे आभारही मानले आहेत.

आता आम्ही आमची लढाई स्वत: लढणार आहोत. मोदींनी आमचा आवाज बनून तो संंपूर्ण जगात पोहोचवावा, अशी अपेक्षाही करीमा हिने व्यक्त केली आहे.

दरम्यान, मोदींनी गेल्या आठवड्यात दोनदा पीओके आणि बलूचिस्तानचा उल्लेख केला होता. बलूचमधील लोकांना आपल्या हक्कासाठी पाकिस्तान विरोधात आवाज उठवण्यासाठी मोदींंकडून प्रेेरणा मिळाली होती.

आणखी काय म्हणाली करीमा...?
- करीमा हिने मोदींना रक्षाबंधनच्या शुभेच्छांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
- "बलूचिस्तानातील एका बहीणीने आपल्याला भाऊ मानले आहे. मला आपल्याला काही सांगायचे आहे. माझे नाव करीमा बलोच असून मी बलूचिस्तान स्टूडेंट्स असोसिएशनची अध्यक्ष आहे."
- ''पाकिस्तानच्या आर्मीने आमच्या लोकांंना ठार मारले आहे. तर काही अद्याप बेपत्ता आहेत."
- "बलूचिस्तानातील अनेक बहिणी भावाची वाट पाहात आहे. कदाचित ते परतही येणार नाहीत. पण, बहिणींंची प्रतिक्षा संंपणार नाही."
- "रक्षाबंधनच्या न‍िमित्तानेे बलूचिस्तानमधील सर्व महिला आपल्याला (मोदी यांनी) भाऊ मानतात. मला विश्वास आहे की, जेनोसाइड व ह्यूमन राइट्स वॉयलेशनविरोधात तुम्ही इंंटरनॅशनल फोरमवर बलूचिस्तानचा आवाज बनाल. बलूचिस्तानातील त्या बहिणांंना न्याय मिळवूून द्याल, त्यांंचेे भाऊ अद्याप बेपत्ता आहेत.''
- करीमा हिने पुढे सांगितले की, "आम्ही स्वत:ची लढाई स्वत: लढणार आहे. मोदींनी आमचा आवाज बनून तो संंपूर्ण जगात पोहोचवावा, अशी अपेक्षाही करीमा हिने व्यक्त केली आहे."


पुढील स्लाइडवर पाहा, करीमा बलोच हिने मोदींंना पाठवलेल्या शुभेच्छेेचा व्हिडि्ओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...