आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक पंतप्रधानांचा आज पुन्हा ‘काश्मीर राग’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संयुक्त राष्ट्र - आम सभेच्या निमित्ताने काश्मीर विषयाला पुन्हा हात घालण्याचा प्रयत्न करू पाहणारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना बुधवारी बलूच समर्थकांच्या घोषणाबाजीचाही सामना करावा लागणार आहे.संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयाबाहेर बलूच समर्थक पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या विरोधात घोषणाबाजी करताना दिसतील. ७१ व्या सत्राच्या निमित्ताने शरीफ बुधवारी आपल्या भाषणात काश्मीरवर बोलणार आहेत. सकाळच्या सत्रात ते होईल. बलुचमध्ये पाकिस्तानी सैनिक मानवी हक्काची पायमल्ली करत आहे. त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर निषेध करण्यासाठी समर्थक न्यूयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. गेल्या आठवड्यातच शरीफ यांनी काश्मीरला नैतिक, राजकीय पाठिंबा असेल, असे स्पष्ट केले होते. काश्मीरमध्ये शांततेसाठी पाकिस्तानने चार कलमी कार्यक्रमही आम सभेत मांडला आहे. परंतु भारताने त्याला फेटाळून लावले आहे. आम्हाला अशा चार कलमी कार्यक्रमाची मुळीच गरज नाही. पाकिस्तानने अगोदर दहशतवादी कारवायांचा बीमोड करावा. त्यानंतर चर्चेसाठी एकत्र यावे, असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे. सुषमा स्वराज यांचे २६ रोजी भाषण होणार आहे. त्यात स्वराज शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेणे अपेक्षित आहे.
पुढे वाचा...
> शरीफांना झापले
> संयुक्त राष्ट्राचे ७१ वे अधिवेशन सुरू
> आेबामांचा क्रमांक हुकला
बातम्या आणखी आहेत...