आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिबिया, सिरिया, इराकमध्ये इसिसच्या अड्ड्यांवर बाॅम्ब; तीन दहशतवाद्यांचा खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरुत / वॉशिंग्टन- अमेरिकेच्या हवाई दलाने लिबिया, सिरिया व इराकमधील इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर जोरदार हवाई हल्ले केले. हवाई दलाच्या जेट विमानांनी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर बाॅम्बवर्षाव केला. त्यात ड्रोनचे माहितगार असलेल्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचा दावा अमेरिकेच्या हवाई दलाने केला आहे.  

इसिससाठी ड्रोन तयार करणारे तीन प्रमुखांचा हवाई दलाने खात्मा केल्याचा दावा इराकमधील अमेरिकेच्या सैन्य मोहिमेचे प्रवक्ता कर्नल रेयान डिलन यांनी केला आहे. हे तीनही दहशतवाद्यांचा सिरियातील मायादिन संशोधन कार्यशाळेत खात्मा झाला. त्यापैकी दोघांनी इसिसच्या ड्रोनची निर्मिती केली होती आणि त्याचे आधुनिकीकरण करण्याचे कामही केले होते. तिसऱ्या दहशतवाद्याची आेळख ड्रोन डेव्हलपर अशी करण्यात आली आहेेे. 

इसिसचा म्होरक्या बगदादीचा एक वर्षानंतर नवा ऑडिआे  
इसिसचा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीचा नवीन ऑडिआे टेप जारी झाला आहे. त्यात बगदादी आपल्या लढवय्यांना युद्ध सुरू ठेवा, अशी चिथावणी देत असल्याचे दिसते. उत्तर कोरियाने जपान व अमेरिकेला दिलेल्या धमकीचाही ताज्या टेपमध्ये उल्लेख आहे. ४६ मिनिटांच्या टेपमध्ये बगदादी अमेरिकेसोबत मोसूलमधील संघर्षाचाही उल्लेख केला आहे. अमेरिका रशियासमोर कमकुवत पडू लागले आहे. युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला धैर्याने लढावे लागेल. नोव्हेंबर २०१६ मध्ये बगदादीचा शेवटचा टेप जारी झाला होता. बगदादीच्या ऑडियो टेपची पडताळणी अमेरिकेचा गुप्तचर विभाग करणार आहे. बगदादीच्या मृत्यूबाबतही त्यातून पडताळणी केली जाणार आहे.

१६४ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर 
बगदादीवर अमेरिकेने सुमारे १६४ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. जुलै २०१४ नंतर तो सार्वजनिक ठिकाणी दिसून आला नाही. तेव्हा आलेल्या एका व्हिडिआेत बगदादी मोसूलच्या अल-नुरी मशिदीत समर्थकांना संबोधित करताना दिसून आला होता.  

आतापर्यंत आठ वेळा मृत्यूचा दावा  
ऑडिआे टेप जारी झाल्यानंतर बगदादीच्या मृत्यूच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. यंदा सिरियाच्या एका सरकारी टीव्हीने देखील बगदादीचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता. गेल्या तीन वर्षांत ८ हून अधिक वेळा त्याचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता.  
बातम्या आणखी आहेत...