आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनमध्ये भारतीय डॉक्टरवर बंदी, रुग्णाला लिहिले प्रेमपत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटन मेडिकल ट्रिब्युनलने भारतवंशीय डॉ. सचिंद्र अमरगिरी यांच्या प्रॅक्टिसवर बंदी घातली आहे. सचिंद्र यांनी महिला रुग्णाला प्रेमपत्र लिहिल्याचे उघड झाले. त्यांच्या व्यावसायिक मूल्यांच्या विरुद्ध हे असल्याचे ट्रिब्युनलने म्हटले आहे. यूके मेडिकल प्रॅक्टिशनर्समध्ये त्यांची नोंदणी होती. एका रुग्ण महिलेला पोटाच्या विकाराने ग्रासले होते. ५९ वर्षीय डॉ. सचिंद्र तिला उपचार देत होते. या महिलेला त्यांनी प्रेमपत्र लिहिले. तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये जेव्हा पहिल्यांदा आला होतात तेव्हापासूनच मला आेढ निर्माण झाल्याचे त्यांनी या पत्रात लिहिले होते.  
आपल्यावर पत्रामुळे मानसिक आघात झाल्याचे तिने सांगितले. एक डॉक्टर म्हणून मी त्यांना अनेक बाबी सांगितल्या आहेत. त्यांनी माझ्याविषयी अतिरिक्त माहिती काढली असावी अशी भीती मला वाटते, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. माझा पत्ता, फोन नंबर मी डॉक्टर म्हणून शेअर केला. त्याचा वापर प्रेमपत्र पाठवण्यासाठी होईल असे वाटले नव्हते, असे महिलेने कोर्टासमोर सांगितले.  मी तुम्ही दिलेल्या माहितीचा गैरवापर करत आहे. मात्र, डॉक्टर म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मी पत्रासाठी संपर्क पत्ता, क्रमांकांचा वापर करणे योग्य नव्हे, अशी कबुलीही पत्रात अमरगिरी यांनी दिली आहे. त्यांनी कॉफी घेण्यासाठी पत्राद्वारे महिलेला निमंत्रण दिले. मात्र, आकर्षणातून निमंत्रण दिले नव्हते. मी त्यांचा अनादर करत नाही, असा खुलासा अमरगिरींनी दिला. 
 
सनद काढणार  
डॉक्टरांनी संबंधित महिलेची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, आता डॉ. अमरगिरींची सनद काढून घेण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...