आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियामध्ये खासगी इंटरनेट वापरावर आयएसची बंदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बैरूत- इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने हिंसाचाराबरोबरच आता नागरिकांना जगापासून
तोडण्याचे षड्यंत्र आखले आहे. सध्या आयएसने राका भागात इंटरनेट वापरावर निर्बंध घातले आहेत. घरगुती तसेच दहशतवाद्यांनाही इंटरनेट वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.
नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणण्याचे काम आयएस करू लागली आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जीवन अधिकच बंदिवान झाले आहे, असे सिरियाच्या निरीक्षण करणाऱ्या संस्थेने म्हटले आहे. चार दिवसांत खासगी वायफाय जोडणी तोडण्यात यावी, असा इशारा हशतवाद्यांनी दिला आहे. इंटरनेटचा वापर करण्याची परवानगी विशिष्ट परिस्थितीत देण्यात आली आहे. राका शहरातील काही कॅफेंवर इंटरनेट उपलब्ध करून देण्यात आले आहे. तेथे इंटरनेटचा वापर करता येऊ शकेल. परंतु त्यावर इस्लामिक स्टेट निगराणी ठेवणार आहे. दहशतवादी संघटनेच्या निगराणीखालीच केवळ सर्फिंग करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर संकोच झाल्याचा दावा संस्थेने केला आहे. राका हे दमास्कसपासून काही अंतरावरील महत्त्वाचे शहर आहे.
इस्लामिक स्टेटच्या नृशंस कारवायांचे केंद्र आहे. मुस्कटदाबी कशासाठी?
नागरिकांनी बाहेरच्या जगाला शहरातील घडामोडींची माहिती देऊ नये. त्याचबरोबर दहशतवाद्यांच्या बाहेरील संपर्कावरही नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. दहशतवादाचे प्रशिक्षण घेताना अचानक घरी परतण्याचा विचार आल्यास अशा दहशतवाद्यांना आपल्या कुटुंबाशी
संपर्क साधता येऊ नये, म्हणून हा बंदोबस्त केला जात आहे.
१९९० पासून वाटाघाटी
अल कायदा दक्षिण आशियासाठी बाहेरील संघटना आहे. अरब जगापेक्षा वेगळ्या पद्धतीने व कट्टरवादाच्या वातावरणात कारवाया चालवण्यासाठी ही संघटना १९९० पासून काही पंथांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
अल कायदा रोखणार
इस्लामिक स्टेटचा दक्षिण आशियातील वाढता प्रभाव रोखण्यासाठी अल कायदाने मुस्लिम समुदायातील एका विशिष्ट वर्गावर लक्ष केंद्रित केले आहे. विशिष्ट पंथातील काही नवीन चेहरे संघटनेत सक्रिय झाले आहेत. त्यावरून आयएसचा धोका रोखण्याचा प्रयत्न केला जात
असल्याचे ‘बीबीसी’च्या वृत्तात म्हटले आहे. दक्षिण आशियात इस्लामिक स्टेटच्या एका म्होरक्याने या रणनीतीची कल्पना मांडली होती. हा एक पंथ मानला जातो. आयएस आणि अल कायदा यांच्यात सदस्यसंख्या वाढवण्यावरून संघर्ष सुरू आहे.
बातम्या आणखी आहेत...