आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मांजरांशी क्रौर्याने वागणाऱ्या महिलेला प्राणी पाळण्यास बंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - ४३ वर्षीय ऑस्ट्रेलियन महिला आपल्या पाळीव मांजरांचे पालनपोषण करू शकली नाही. तिने त्यांच्याशी क्रौर्याची वागणूक ठेवली. यापुढे तिला प्राणी पाळण्याची परवानगी नाकारली आहे. १२ महिन्यांसाठी तिला ‘गुड बिहेवियर’ बाँडवर ठेवण्यात आले आहे.

या महिलेने आपले घर बदलताना १४ पाळीव मांजरांना तेथेच सोडले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये उपनिरीक्षक तिच्या जुन्या घराची पाहणी करण्यास गेले होते. तेथील १३ मांजरे मरून पडली होती. भूक भागवण्यासाठी त्यांनी परस्परांना खाणे सुरू केले होते. केवळ एक मांजर जिवंत होते. तेदेखील जखमी होते. त्याला उपचार देऊन सुरक्षित जागी पोहोचते केले.

महिलेची मानसिक स्थिती ध्यानात घेऊन कोर्टाने शिक्षा कमी केली. तुम्हाला पाळीव प्राण्यांची काळजी घेता येत नसेल तर त्यांना नातलग, मित्र परिवार किंवा प्राणी संवर्धनगृहात ठेवा, त्यांना असे सोडून देणे कायद्याविरुद्ध आहे. अशी समज कोर्टाने दिली.
बातम्या आणखी आहेत...