आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेशकडून वाजपेयी यांचा सर्वोच्च गौरव होणार, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पुरस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा देशातील सर्वोच्च पुरस्काराने गौरव केला जाणार आहे. १९७१ च्या स्वातंत्र्य युद्धाला वाजपेयी यांनी खासदार असताना खंबीरपणे पाठिंबा दिला होता. त्याची दखल घेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बांगलादेशने वाजपेयींना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर अवार्डने वाजयेपी यांचा गौरव केला जाणार आहे. वाजपेयी यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी बांगलादेश दौ-यात हा पुरस्कार त्यांच्या वतीने स्वीकारतील. ६ जून रोजी हा पुरस्कार मोदी स्वीकारतील. १९७१ च्या युद्धाच्या पहिल्या दिवसापासून वाजपेयी यांनी अगदी खंबीर भूमिका घेत बांगलादेशच्या स्वातंत्-याचे जोरदार समर्थन केले. एवढेच नव्हे तर तत्कालीन जनसंघाचे अध्यक्ष तथा खासदार असताना वाजपेयी यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्य लढ्याला भारतातील घराघरापर्यंत पोहचवले होते.

हा बांगलादेशतील नागरिकांच्या हक्काचा लढा असल्याचे त्यांनी मांडले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन बांगलादेश सरकारने देशाचे परदेशी मित्र म्हणून त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला.

इंदिरा गांधी पहिल्या
बांगलादेशच्या वतीने परदेशी मित्र म्हणून दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना पुरस्कार देऊन गौरवले होते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना देखील हा सन्मान देण्यात आला होता.