आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेश हल्ला, संशयितांमध्ये दोन ब्रिटिशांचा समावेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगला देशातील दहशतवादी हल्ला प्रकरणी अटकेतील संशयितांमध्ये दोघे ब्रिटनचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात कॅनडा विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले.बुधवारी रात्री बांगलादेश-ब्रिटीश वंशाचा हसनत करिम व ताहमिद हसिब खान यांना अटक करण्यात आली होती. त्यांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर कोर्टाने त्यांची आठ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली. दोघांना कोर्टात हजर केले. तेव्हा न्यायालयाच्या परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. दोघांच्याही कुटुंबियांनी ते २ जुलैपासून घरी परतले नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे हल्ल्यात त्यांंचा हात असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.गेल्या महिन्यात १ जुलै रोजी कॅफेवर झालेल्या हल्ल्यात २२ जणांचा मृत्यू झाला होता. त्या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने घेतली होती. त्याच्या तपासाला गती मिळाली आहे.
बातम्या आणखी आहेत...