आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladesh: Islamist Leader Kamaruzzaman's Appeal Rejected

बांगलादेशच्या जमात नेत्याची फाशी कायम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशमधील जमात इस्लामी या संघटनेला न्यायालयाने जोरदार धक्का दिला आहे. संघटनेचा प्रमुख नेता आणि महासचिव मोहंमद कमरुज्जमा यांनी दाखल केलेली फाशीविरोधातील पुनर्विचार याचिका बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

त्यामुळे त्यांच्या फाशीवर आता शिक्कामोर्तब झाले असून कोणत्याही क्षणी त्यांना फाशी दिली जाऊ शकते. यासाठी बांगलादेशमध्ये सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. १९७१ च्या स्वातंत्र्यसंग्रामादरम्यान देशविघातक गुन्हे केल्याप्रकरणी त्यास फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. दरम्यान, कमरुज्जमा यांनी या शिक्षेच्या पुनर्विचारासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सरन्यायाधीश सुरेंद्र कुमार सिन्हा यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय पीठाने ती फेटाळून लावली. दरम्यान, राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्यासाठी कमरुज्जमा यांना एक ते दोन तासांची मुदत दिली जाऊ शकते, असे बांगलादेशचे कायदामंत्री अनिस उल हक यांनी सांगितले आहे.

तुरुंग नियमांनुसार यासाठी २१ दिवसांची मुदत मिळायला हवी, परंतु कमरुज्जमा यांना आता कोणत्याही क्षणी फासावर चढवण्यास सरकारवर कोणतेही बंधने नाहीत, असे बांगलादेशचे महाधिवक्ता महबूब आलम यांनी निर्णयानंतर म्हटले आहे. दरम्यान, त्यांच्या फाशीसाठी तुरुंग व्यवस्थापनाकडून पूर्ण तयारी झाल्याने तुरुंग अधिकार्‍यांनी म्हटले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर देशात विविध ठिकाणी काही समाजविघातक कृत्ये घडू शकतात. या पार्श्वभूमीवर देशभरात निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.