आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Bangladesh Railway Minister And His 38 Year Younger Wife

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : जेव्हा बांगलादेशच्या 67 वर्षीय रेल्वेमंत्र्यांनी केला 29 वर्षांच्या मुलीशी विवाह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजिबुल हक पत्नी होनुफा अख्तर रिक्ताबरोबर. - Divya Marathi
मुजिबुल हक पत्नी होनुफा अख्तर रिक्ताबरोबर.
ढाका - गेल्या वर्षी बांग्लादेशचे एक मंत्री चांगलेच चर्चेत होते. कामासाठी नव्हे तर त्यांच्या विवाहामुळे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात 67 वर्षीय रेल्वेमंत्री मुजिबुल हकने स्वतःपेक्षा 38 वर्षांनी लहान असलेल्या मुलीबरोबर विवाह केला होता. कोमिला येथे एका भव्य सोहळ्यामध्ये 29 वर्षीय होनुफा अख्तर रिक्ता हिच्याशी मुजिबुल यांनी विवाह केला होता.

विवाह सोहळा
कोमिलाच्या चांदिनामध्ये एका भव्य सोहळ्यात या दोघांनी विवाह केला होता. स्थानिक माध्यमांच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले होते की, रेल्वेमंत्र्यांच्या वतीने मेहरच्या रुपात चार लाख रुपये देण्यात आले होते. तसेच होलुद (हळदी) साठी त्यांनी त्यांच्या मेव्हणीला एक लाख टका दिले होते. रेल्वेमंत्र्यांच्या स्वागतासाठी ढाका-चटगाव हायवे खास पद्धतीने सजवण्यात आला होता. जागोजागी त्यांच्या स्वागतासाठी लोक उभे होते.

नवरी सर्वसाधारण कुटुंबातील
होनुफा अख्तर रिक्ता एका साध्या ग्रामीण कुटुंबातील आहे. तिने विधीचे शिक्षण केले आहे. विवाहानंतर रेल्वेमंत्र्यांनी इच्छा असल्यास त्यांची पत्नी वकिली करू शकते असे म्हटले होते.

(टिप- पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात बांगलादेश दौऱ्यावर जात आहेत. त्या निमित्ताने बांगलादेशबाबत आणि तेथील घटनांबाबत माहिती आम्ही देणार आहोत.)

पुढील स्लाइड्सवर पाहा, या विवाह सोहळ्याचे PHOTOS