आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशात मोफत कपडे वाटताना झालेल्या चेंगरा चेंगरीत 20 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - उत्तर बांगलादेशच्या मेमनसिंह शहरात शुक्रवारी मोफत कपडे वाटपाच्या कार्यक्रमात झालेल्या चेंगरी चेंगरीमध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून सुमारे ५० पेक्षा अधिक लोक या घटनेत जखमी झाले आहेत.
स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका कारखान्यामध्ये हे कपडे वाटले जाणार होते. त्यासाठी पहाटेपासूनच आवारात गर्दी व्हायला सुरुवात झाली होती. शेकडो लोक याठिकाणी जमा झाले होते. पण लोक जेव्हा छोट्या गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी चेंगरी चेंगरी झाली.

मेमनसिंह येथील पोलिस प्रमुख मोइनुल हकी यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात बहुतांश महिला आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. या प्रकरणी कारखान्याच्या मालकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये मुस्लिम लोक गरीबांना मोफत कपड्यांचे वाटप करत असतात. त्याचप्रमाणे तंबाखूच्या खारखान्याच्या मालकानेही कपडे मोफत वाटण्याची घोषणा केली होती. त्यानंतर याठिकाणी सुमारे दीड हजार लोक जमा झाले होते.