आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बांगलादेश : कट्टरपंथियांच्या भीतीने हेल्मेट घालून पायी चालतात ब्लॉगर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - बांगलादेशाचा ब्लॉगर अनंत विजय याच्या हत्येनंतर अनन्य आझादला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे - Divya Marathi
फाइल फोटो - बांगलादेशाचा ब्लॉगर अनंत विजय याच्या हत्येनंतर अनन्य आझादला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे
ढाका (बांगलादेश) - कट्टरपंथियांकडून सततच्या मिळणाऱ्या धमक्यांमुळे बांगलादेशी लेखक-ब्लॉगर जीव मुठीत घेऊन जगत आहेत. फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर ब्लॉगर अनन्य आझादने देश सोडण्याची तयारी केली आहे. तो बांगलादेशातील रस्त्यांवर फिरत असतानाही हेल्मेट चढवून फिरतो. कार चालवतांना सर्व काचा बंद आहेत ना याची खातर जमा करतो. आझादला काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एका पोस्टच्या माध्यमातून धमकी मिळाली होती - आता पुढचा नंबर तुझा !
आझाद पुढील आठवड्यात भारतात जाणार आहे. 12 मे रोजी मारला गेलेला ब्लॉगर अनंत विजय दासचा मित्र मुनीर हुसैन देखील देश सोडण्याच्या तयारीत आहे. बांगलादेशात कट्टरपंथियांनी तीन ब्लॉगरची आतापर्यंत हत्या केली आहे. अनन्य आझादने सांगितले, 'मी ब्लॉग लिहिणे बंद केले आहे. आता मी एक पुस्तक लिहित आहे. लवकरच ते पूर्ण होईल. सध्या मी भारतात जाण्याचा विचार करत आहे.' आझादचे वडील हुमांयू आझाद हे देखील लेखक होते. त्यांची कट्टरपंथियांनी हत्या केली होती.
कट्टरपंथियांनी तयार केली 84 ब्लॉगरची यादी
धर्माविरोधात लिहिणाऱ्या लेखक आणि ब्लॉगरची यादी कट्टरपंथियांनी तयार केली आहे. 84 जणांच्या या यादीत आझादचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. त्याला फेसबुकवर आलेल्या धमकीत त्याच्या वडिलांना 'नास्तिकांचा सरदार' म्हटले आहे. आझादचे म्हणाला, 'मला माहित आहे ते लोक मला देखील मारून टाकतील. माझा शिरच्छेद करुन डोके ढाका विद्यापीठात टांगतील. मी विचार केला होता, की पोलिसांत तक्रार द्यावी. पण माझ्या वडिलांच्या हत्येला 11 वर्षे झाली आहेत. अजूनही पोलिसांना त्यांच्या मारेकऱ्यांचा पत्ता लागलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून काय आशा ठेवणार.'
स्वतःला बंद करुन घेतले
ब्लॉगर अनंत विजय याची 12 मे रोजी काही बुरखाधारी लोकांनी हत्या केली. त्याच्या हत्येने घाबरलेला त्याचा मित्र मुनिरने ब्लॉग लिहिणे बंद केले आहे. मुनिरने एका वृत्तपत्राला सांगितले, '15 दिवसांपासून मी एका खोलीत बंद आहे. ना टीव्ही पाहातो ना न्यूजपेपर वाचतो. मी माझे फेसबुक प्रोफाइल देखील डिअॅक्टिव्ह केले आहे.'
बातम्या आणखी आहेत...