आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bangladeshi Law Student Who Opposed Radical Islam Hacked To Death

बांगलादेशमध्‍ये ब्लॉगरवर सु-याने हल्‍ला, FB वरील कमेंट ठरली जिवघेणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका- बांगलादेशमध्‍ये फेसबुकवर इस्लामविरोधी कमेंट करणा-या एका लॉ शिकणा-या विद्यार्थ्‍याची क्रुरपणे हत्‍या करण्‍यात आली. बुधवारी रात्री चार हल्‍लेखोरांनी आधी त्‍याच्‍या डोक्‍यावर मटण कापण्‍याच्‍या सुरीने हल्‍ला केला. नंतर जवळून गोळी झाडून त्‍याची हत्‍या करण्‍यात आली. मात्र, आतापर्यंत या हल्‍ल्याची जबाबदारी कुणी घेतली नाही. रस्‍त्यावर अल्लाहू अकबर म्‍हणत केली हत्‍या..
- उपायुक्त सय्यद नुरुल इस्लाम म्‍हणाले, "हे टार्गेट किलींचे प्रकरण आहे. आतापर्यंत कोण्‍याही गटाने या हल्‍ल्याची जबाबदारी घेतली नाही."
- हल्‍लेखोरांनी 28 वर्षीय नजीमुद्दीन समदची हत्‍या ढाकाच्‍या जगन्नाथ यूनिवर्सिटीसमोर
केली.
- दोन महिन्‍यांआधी समदने जगन्नाथ यूनिवर्सिटीमध्‍ये लॉसाठी प्रवेश घेतला.
पोलिस काय म्‍हणाले..
- उपायुक्‍त इस्लाम म्‍हणाले, " समद ढाकामध्‍ये पोहोचण्‍याआधीच हल्‍लेखोरांचे त्‍याच्‍या हालचालींवर लक्ष होते."
- समदची हत्‍या इस्लामविरोधी कमेंटमुळे झाली किंवा नाही याचा तपास पोलिस घेत आहेत.
लोकांनी भितीने दुकाने बंद केली..
- परिसरात गोळीबाराचा आवाज आल्‍यानंतर व्‍यावसायिकांनी दुकाने बंद केली.
- पोलिसांनी घटनास्‍थळावरुन काही काडतूस ताब्‍यात घेतली.
काय होते पोस्‍ट..
- "बांगलादेशात केवळ 5 वर्षांसाठी शरिया लॉ लागू करावा, मदीना लॉनुसारनियम करावे."
- "मी दाव्‍याने सांगतो की, 5 वर्षानंतर कोणीही मुसलमान इस्लामिक लॉबाबत बोलणार नाही."
कोण आहे नजीमुद्दीन समद?
- समद सिलहट येथील रहिवाशी होता.
- तो सिलहट जिल्‍हा डिस्ट्रिक्ट बंगाबंधु जातीय जुबो परिषद यूनिटचा इन्फॉरमेशन अॅन्‍ड
रिसर्च सचिव होता.
- समद आणि त्‍याचे मित्र फेसबुकवर सेक्युलरिज्मबाबत मोहिम चालवत होते.
- हत्येच्‍या आधी त्‍याने फेसबुक पोस्टव्‍दारे कायदा व सुव्यवस्थेबाबत चिंता व्‍यक्‍त केली
होती.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, याआधीही एकाची कु-हाडीने हत्‍या..