आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात फरार घोषित करण्यात आलेल्या झाकिर नाइकला मलेशियाने दिले स्थायी नागरिकत्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - कथित भडकाऊ भाषणे आणि धार्मिक द्वेष प्रकरणी भारत आणि ब्रिटनमध्ये चौकशीला सामोरे जाणाऱ्या वादग्रस्त धर्मगुरू झाकीर नाइकला मलेशियाने स्थायी नागरिकत्व दिले आहे. झाकीर नाइक सध्या मलेशियात असून एका मशीदीबाहेर त्याला पाहण्यात आले आहे. याचवेळी लोक त्याच्यासोबत सेल्फी घेतानाचे फोटोज व्हायरल होत आहेत. मलेशिया सरकार आणि वरिष्ठ अधिकारी झाकीर नाइकला संरक्षण देत आहेत. 
 
मुस्लिम बहुल मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांच्या राजवटीत इस्लामचे राजकारण आणि कट्टरवादाला प्रोत्साहन दिले जात असल्याचे आरोप आहेत. त्यातच वादग्रस्त धर्मगुरू झाकिर नाइकला शरण देऊन त्यांनी आपली विचारसरणी पुन्हा सिद्ध केली. यूट्युबवर एका व्हिडिओमध्ये झाकीर नाइकने सभेत बोलताना समलैंगिक आणि इस्लाम सोडणाऱ्यांसाठी मृत्यूदंडाचे समर्थन केले आहे. तसेच एका व्हिडिओमध्ये तो म्हणतो, "दहशतवादी लादेन अमेरिकेत दहशत पसरवत असेल तर जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी अमेरित दहशत पसरवणाऱ्या लादेनला माझा पाठिंबा राहील." भारत, ब्रिटन आणि बांगलादेशसह अनेक देशांमध्ये झाकिर नाइकच्या पीस टीव्हीवर बंदी लावण्यात आली आहे. तसेच इस्लामिक रिसर्च फाउंडेशनला मिळणाऱ्या निधींची चौकशी सुरू आहेत. झाकिर नाइकच्या या संघटनेचे दहशतवाद्यांशी आर्थिक व्यवहार असल्याचे भारतात आरोप आहेत. 
बातम्या आणखी आहेत...