आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Barack Obama Breaks Down In Tears As He Unveils Plan To Cut Gun Violence

गोळीबाराच्या घटनांमुळे बराक ओेबामांचे डोळे पाणावले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओेबामा अचानक भावुक झाले. वाढत्या हिंसेवर संवेदना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले. देशात गोळीबाराच्या वाढत्या घटनांमुळे हजारो निरपराधांचे बळी जात असल्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली.

तीन वर्षांपूर्वी कनेक्टिकटच्या न्यू टाऊनमध्ये एका शाळेत गोळीबार झाला. यात २० बालकांचे प्राण गेले. या घटनेचा उल्लेख करताना राष्ट्राध्यक्षांचे डोळे पाणावले. त्या मुलांचा विचार आला तरीही मला अस्वस्थ होते. यावर कठोर निर्बंध आणण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

बंदुकांसाठीच्या परवान्याची प्रक्रिया अधिक कडक करण्याची गरज आहे. बंदूक विक्रेत्यांकडे परवाना असणे अनिवार्य करावे तसेच विकत घेणाऱ्या व्यक्तीची पार्श्वभूमीही तपासली जाणे गरजेचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली. गन विक्रेते उद्योजक लॉबीने सरकारी कारवाईत अडथळे आणू नयेत, असा इशाराही त्यांनी दिला.