आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरपावसात ओबामांचे आगमन, ८८ वर्षांनी क्युबात पोहोचला US चा राष्ट्रपती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवाना - कम्युनिस्टांचे शासन असलेल्या लॅटिन अमेरिकेन देश क्युबासोबत अनेक दशकांपासून सुरू असलेले वैर विसरून अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा सोमवारी सहकुटुंब क्युबामध्ये दाखल झाले. रविवारी सायंकाळी येथील होसे मार्ती विमातळावर ओबामा आले तेव्हा येथे प्रचंड पाऊस सुरू होता. भरपावसात ओबामा छत्री घेऊन विमानातून बाहेर पडले. त्यांचे क्युबाचे परराष्ट्रमंत्री ब्रुनो रोद्रिग्वेज यांनी उत्साहात स्वागत केले. त्यानंतर ओबामांनी पत्नी मिशेल, दोन मुलींसह हवानाच्या रस्त्यावर छत्री घेऊन विविध स्थळांना भेटी दिल्या. बराच काळ ते भरपावसात फिरत होते. येथे येण्यापूर्वी त्यांनी स्थानिक भाषेत टि्वटही केले.

ओबामा तीन दिवसांच्या क्युबा दौऱ्यावर आले आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांनी राष्ट्रपती राऊल कॅस्ट्रो यांची भेट घेतली. माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांची भेट घेण्याचे त्यांचे कोणतेही नियोजन नाही. परंतु रशियन असंतुष्ट नेत्यांची भेट घेणार असल्याचे आेबामांनी हवानाला रवाना होण्यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यावरून क्युबात नाराजी नाट्यही घडले होते. क्युबामध्ये फिडेल कॅस्ट्रो यांच्या १९५९ च्या क्रांतीनंतर नव्हे, तर ८८ वर्षांनंतर अमेरिकन राष्ट्रपती क्युबात आले आहेत. अमेरिकेने ५४ वर्षांपूर्वी क्युबावर आर्थिक िनर्बंध लागू केले आहेत. शीतयुद्धाच्या वेळी क्युबा अमेरिकेचा शत्रू व सोव्हिएत संघाचा मित्र होता. त्यामुळे अमेरिकचे आणि क्युबाचे कधी पटले नाही.
बातम्या आणखी आहेत...