वॉशिंग्टन - नाटो शिखर परिषदेपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. उभय नेत्यांमध्ये सिरिया, युक्रेन आणि इसिस (इस्लामिक स्टेट) या मुद्द्यांवर चर्चा झाली.
सिरियातील संकट संपवण्यासाठी ओबामांनी पुतीन यांची मदत मागितली. ओबामा या आठवड्यात पोलंड आणि स्पेनला जाणार असून तेथे ते नाटो शिखर परिषदेत भाग घेतील आणि युरोपच्या प्रमुख नेत्यांना भेटतील. व्हाइट हाउसच्या प्रवक्त्याने ओबामा-पुतीन यांच्या चर्चेची माहिती दिली. प्रवक्त्याने सांगितले की, इसिस आणि सिरियात सक्रिय अल कायदाचा घटक नुसरा फ्रंट यांना हरवण्यासाठी दोन्ही नेत्यांनी वचनबद्धता दर्शवली.
ओबामांनी सिरियात संघर्ष संपवण्यासाठी राजकीय बदलावर भर दिला. ओबामांनी सिरियात संयुक्त राष्ट्रांचे विशेष दूत स्टीफन दे मिस्तुरा यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले. उल्लेखनीय म्हणजे ओबामा हे सिरियात अध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हटवण्यास उत्सुक आहेत, तर पुतीन हे तिथे असद यांना सत्तेत राहण्यासाठी मदत करत आहेत.
अमेरिका अफगाणिस्तानमध्ये ८४०० सैनिक ठेवणार
अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये आपल्या सैनिकांची संख्या ८४०० पर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी ओबामा यांनी सैनिकांची संख्या ९८०० वरून कमी करून ५५०० करण्याचा निर्णय घेतला होता. आता ओबामांचे म्हणणे आहे की, अफगाणिस्तानची सुरक्षा अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाने ओबामांच्या निर्णयावर टीका केली आहे. अफगाणिस्तानमध्ये यावर्षी अखेरपर्यंत ओबामांचाच निर्णय लागू होईल. पुढील वर्षी जानेवारीत अमेरिकेचे नवे अध्यक्ष तो बदलू शकतील.
ईयू-अमेरिका चर्चा
युरोपियन संघटनेतून (ईयू) बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर अमेरिकेने ब्रिटनसोबत संबंध वाढवण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका आणि ईयू यांच्यात शुक्रवारी एक बैठक होत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बेन रोड्स यांनी सांगितले की, अध्यक्ष ओबामा या आठवड्यात ईयूच्या प्रमुख नेत्यांना भेटतील. ते नाटो शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी युरोपात येत आहेत. ईयूतील २७ पैकी २२ देश नाटोचे सदस्य आहेत.
ओबामा यांनाही भेटणार
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा युरोप प्रवासात अनेक प्रमुख नेत्यांना भेटतील. त्यात पोलंड आणि स्पेनच्या नेत्यांसोबत युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरेशेन्को, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून, जर्मनीच्या चॅन्सलर एंगेला मर्केल, फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांचा समावेश आहे.