आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेजारी देशांना धमकी दिली तर गंभीर परिणामर; ओबामांचा चीनला इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील घुसखोरीवर अमेरिकेने जहाल प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक आेबामा यांनी समुद्रातील स्फोटक स्थितीस केवळ चीनचे धोरणच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. चीनने शेजारील देशांना धमकावू नये; अन्यथा त्यांचे गंभीर परिणाम होतील, असा इशाराही ओबामांनी दिला.

जी-२० देशांच्या परिषदेसाठी निघण्यापूर्वी आेबामांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत ही मते व्यक्त केली होती. ओबामा म्हणाले की, चीनच्या शेजारी राष्ट्रांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता समुद्रातील वाढते सैन्यबळ यामुळे संपूर्ण अाशियातच तणाव निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय कायदा सुव्यवस्थेशी आपण बांधले गेलो आहोत. हे नियम सर्व राष्ट्रांच्या सहमतीने निश्चित केले आहेत. कोणावर लादले गेले नव्हते. याचे भानही चीन विसरत आहे, आंतरराष्ट्रीय सुव्यवस्था सर्वांच्या हितासाठी आहे हे चीनसारख्या राष्ट्राने विसरावे ही ऐतिहासिक चूक ठरेल. आर्थिक धोरणांच्या मजबुतीवरही चीनच्या आक्रमक धोरणामुळे विपरीत परिणाम होत आहे.
आर्थिक निर्णय घेताना अमेरिकेचे निकष स्पष्ट असून दक्षिण चीन समुद्रातील स्थितीमुळे यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे, असा इशारा बराक आेबामा यांनी दिला.

आंतरराष्ट्रीय सुव्यवस्थेच्या चौकटीत बसत असेल तरच चीनशी मैत्री टिकून राहील या शब्दात आेबामांनी उभय राष्ट्रांच्या सहकार्य करारांविषयी चीनला सूचित केले. व्यापार आर्थिक बाबीत चीन-अमेरिका मैत्रीपूर्ण संबंध आणि आंतरराष्ट्रीय समस्यांवर परस्पर शत्रू या दोन्ही स्थिती एकाच वेळी असू शकत नाहीत. चीनचे पूर्वीचे आर्थिक धोरण पाश्चात्त्य देशांच्या अर्थविचारापेक्षा विपरीत होते. २० वर्षांपासून अमेरिका-चीन आर्थिक सहकार्य सुरू आहे. चीनने राज्यसत्तेच्या अखत्यारीतील भांडवलशाही व्यवस्था स्वीकारली निर्यातीला चालना देणारे धोरण स्वीकारले होते ते यशस्वीही ठरल्याचे आज सिद्ध होत आहे.

आर्थिक महासत्तेच्या जबाबदाऱ्या अधिक
चीन जगातील आर्थिक महासत्ता असल्याने त्याची जबाबदारीही अधिक आहे. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर तर ती आहेच आहे. चीनने शांततेसह विकास साधावा, असे अमेरिकेने वारंवार सुचवले आहे. चीनचा विकास सर्वांच्या हिताचा असून चीन पुन्हा ढासळला तर ते जगासाठी धोक्याचे असेल, असे मत बराक आेबामांनी व्यक्त केले.
बातम्या आणखी आहेत...