आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकच्या मोसुलमध्ये 13 वर्षानंतर तुंबळ युद्ध सुरू, 40 हजार सैनिकांकडून 20 गावे ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या आर्मी ऑपरेशनमध्ये इराकी सेना, शिया मिलिशिया गट, कुर्द गट आणि नाटो ग्रुपचा समावेश आहे. - Divya Marathi
या आर्मी ऑपरेशनमध्ये इराकी सेना, शिया मिलिशिया गट, कुर्द गट आणि नाटो ग्रुपचा समावेश आहे.
बगदाद- इराकी आर्मीने इसिसच्या ताब्यातील मोसुल शहर ताब्यात घेण्याने तुंबळ युद्ध सुरु केले आहे. सुमारे 40 हजार सैनिक शहरात घुसले आहेत. या आर्मी ऑपरेशनमध्ये इराकी सेना, शिया मिलिशिया गट, कुर्द गट आणि नाटो ग्रुपचा समावेश आहे. आतापर्यंत तेथील 20 गावे त्यांनी ताब्यात घेतली आहेत. मोसुलमध्ये मागील 13 वर्षापासूनची ही सर्वात मोठी लष्करी कारवाई आहे. याआधी 2003 मध्ये अमेरिकी आर्मीने सद्दाम हुसेनला हटविण्यासाठी मोठे युद्ध छेडले होते. इसिसने जासूसीच्या संशयावरून 58 लोकांना बुडवून मारले...
- जर मोसुल शहर इसिसच्या ताब्यातून काढून घेतले तर इसिसचा इराकमध्ये केवळ 10 टक्के भागावरच कब्जा राहील. असे असले तरी सीरियात इसिसचा प्रभाव व ताकद कायम आहे.
- दरम्यान, इसिसने जासूसीचा आरोप करीत 58 सहका-यांना पाण्यात बुडवून मारले व त्यानंतर जाळून टाकले.
- मोसुल हे इराकमधील सर्वात दुसरे मोठे शहर आहे. हे शहर इसिसच्या ताब्यातून काढण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून योजना आखली जात होती.
- या शहरात आता सुद्धा इसिसचे 7 हजार दहशतवादी आहेत.
इराकच्या पंतप्रधानांनी म्हटले, मुक्ततेची वेळ आली
- पीएम हैदर अल अबादी यांनी सोमवारी सरकारी टेलिविजननर सांगितले की, "दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट (इसिस)च्या ताब्यातून मोसुल शहर सोडविण्यासाठी लष्करी कारवाई सुरु करण्यात आली आहे.
- " आता लोकांना मुक्त करण्याची वेळ आली आहे. मोसुल शहर लवकरच इसिसच्या ताब्यातून सोडवले जाईल. आता इसिसच्या हिंसेतून आणि दहशतवादातून आपली सुटका होईल.
तिकरित, रामादी आणि फजुल्लाह इसिसच्या ताब्यातून मुक्त-
- इराकी लष्कराने मागील दीड वर्षात तिकरित, रामादी आणि फजुल्लाह या भागातून इसिसला हाकलून दिले आहे.
- क्रूड ऑयलचा मुबलक साठा असलेल्या मोसुल शहरावर इसिसने 2014 मध्ये ताबा मिळवला होता.
- बगदादीने इराकमधील या शहराला राजधानी बनवले होते. यानंतर 10 लाख लोकांना हे शहर सोडावे लागले होते.
- यानंतरच बगदादीने फजुल्लाह आणि तिकरितसारखी महत्त्वाची शहरे ताब्यात घेतली होती.
रासायनिक शस्त्रे उडवू शकतात दहशतवादी-
- इसिस आपला शेवटचा गड राखण्यासाठी केमिकल प्लॅन्ट उडवून देऊ शकतात.
- याशिवाय ते आत्मघातकी लोक, कार ब्लास्ट, डायनामाईट ब्लास्ट यासारखे पर्याय वापरू शकतात.
- प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हणण्यानुसार, दहशतवाद्यांनी रस्त्यांवर आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्ब पेरून ठेवले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इराकमध्ये कसे सुरु आहे तुंबळ युद्ध...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...