आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS:इटलीचे \'बॅटल ऑफ ऑरेंज\', येथे लोकांना मिळतो संत्र्यांचा मार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटली'बॅटल ऑफ ऑरेंज'

आयव्हरी - छायाचित्रात तुम्हाला 'बॅटल ऑफ ऑरेंज' फेस्ट दिसत आहे. इटलीचे आयव्हरी शहरातील हा महोत्सव जगभर प्रसिध्‍द आहे. परंपरेनुसार महोत्सवात लोक एकमेंकांना संत्र्यांनी झोडून काढतात.इटलीतील लोक या माध्‍यमातून आपल्या स्वातंत्र्याचे स्मरण करत असतात.

अशा पध्‍दतीने होते सेलिब्रेशन
ऑरेंज फाइटमध्‍ये हजारो लोक सहभाग घेत असतात. एकूण नऊ संघ असतात. यात लोक युनिफॉर्ममध्‍ये येतात. घोडागाडीवर बसून मुख्‍य चौकात येतात आणि शत्रूंची वाट पाहत बसतात.मग सुरु होते बॅटल ऑफ ऑरेंज. युध्‍दा दरम्यान चेह-याचा संत्र्यांपासून बचावासाठी लोक हेल्मेट घालतात. तर काही लोक विना हेल्मेटसह सहभागी होतात. फूड फेस्‍टमध्‍ये जवळजवळ पाच लाख क‍िलो संत्र्यांनी लोक एकमेंकांवर हल्ला करतात. प्रत्येक वर्षाच्या फेब्रूवारी महिन्यात पारंपरिक कार्निव्हल दिवसांच्या गणितानुसार फेस्ट तीन दिवसांपर्यंत साजरा केला जातो. मार्चमध्‍ये या फेस्ट‍ीव्हलचा समारोप होतो.यात विजेत्या संघाची निवड करण्‍यात येते.

पुढे पाहा, ऑरेंज फाइट करत असलेल्या लोकांची छायाचित्रे...