आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया : शॉपिंग मॉलमध्ये घुसले अस्वल, पोलिसांनी घातल्या गोळ्या, पाहा VIDEO

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉलबाहेर उभे असलेले अस्वल. - Divya Marathi
मॉलबाहेर उभे असलेले अस्वल.
मॉस्को - रशियाच्या खाबरोवस्क शहराच्या एका शॉपिंग मॉलमध्ये फिरणाऱ्या एका तीन वर्षांच्या अस्वलाचा व्हिडीओ व्हायपल झाला. त्यावेळी मॉल बंद झाला होता. व्हिडीओमध्ये अस्वल मॉलच्या मेन गेटमधून आत फिरताना दिसत होते. एका कर्मचाऱ्याची नजर त्याच्यावर पडली त्याचवेळी त्याने सुरक्षारक्षकांना याबाबत सूचना दिल्या. सुरक्षारक्षक त्याठिकाणी पोहोचले आणि त्यांनी अस्वलाला मॉलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला.

अस्वल लोकांना पाहून मॉलच्या मने गेटवर येऊन थांबले. पण त्याला बाहेर येता येत नव्हते. त्या प्रयत्नात तो सारखा काचेवर धडकत होता. त्यावेळी ते अस्वल अचानक दाराजवळ पोहोचले आणि दोन्ही हातांनी दार ढकलून बाहेर रस्त्यावर आले. पण त्याठिकाणी आधीच उभ्या असलेल्या पोलिसांनी त्या अस्वलावर एकच गोळीबार सुरू केला. त्यात अस्वलाचा जागीच मृत्यू झाला. रशियाच्या स्टेट इनव्हेस्टीगेटिव्ह एजन्सीने पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच या घटनेचा तपासही सुरू झाला आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मॉलमध्ये घुसलेल्या अस्वलाचे PHOTOS अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO