आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या देशात भरते महिला कैद्यांची सौंदर्य स्पर्धा, विजेत्यांना मिळते हे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - ब्रझीलच्या रिओ डी जेनेरिओ येथे मिस टालाव्हेरा सौंदर्य स्पर्धा गेल्या 12 वर्षांपासून आयोजित केली जाते. या सौंदर्य स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे, यात केवळ महिला कैद्यांनाच एंट्री दिली जाते. दरवर्षी होणाऱ्या या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये शंभराहून अधिक महिला कैदी सहभाग घेतात. विजेत्या महिलेला मिस टालाव्हेरा ब्रूस असा किताब दिला जातो. महिला कैद्यांचा आत्मसन्मान वाढवणे हा या स्पर्धेचा मुख्य हेतू आहे. 

 

> तुरुंगाच्या संचालक जनेना फर्नांडिस यांनी सांगितल्याप्रमाणे, तुरुंगातील महिलांमध्ये कमी पणाची भावना नष्ट करणे आणि त्यांच्या मनात स्वतः विषयी आदर निर्माण करणे हे या स्पर्धेचे मुख्य हेतू आहे.  
> दरवर्षी होणाऱ्या या स्पर्धेची 5 महिन्यांपूर्वीच तयारी सुरू केली जाते. यानंतर स्पर्धेत उमेदवारांची निवड केली जाते. 
> जनेना यांनी सांगितल्याप्रमाणे, तुरुंगात चांगले वर्तन ठेवणाऱ्या महिला कैद्यांनाच या स्पर्धेत प्रवेश दिला जातो. यानंतर विविध फेऱ्यांमध्ये 10 फायनलिस्ट निवडल्या जातात.
> यावर्षी तुरुंगातील एकूण 450 महिला कैद्यांपैकी 150 महिलांनी ब्युटी कॉन्टेस्टमध्ये सहभाग घेतला होता.
> स्पर्धेचा संपूर्ण खर्च मग ते महिलांचे कॉस्ट्युम असो वा मेक-अप साहित्य सर्वांचे पैसे एका एनजीओकडून दिले जातात. 
> या वर्षी झालेल्या स्पर्धेत 26 वर्षीय मयाना रोझा हिला विजेता घोषित करण्यात आले आहे. तिला विजेता म्हणून एक इलेक्ट्रिक फॅन गिफ्ट देण्यात आला. तर उपांत्य आणि उपउपांत्य विजेत्या ठरलेल्या दोघींना अनुक्रम एक इस्त्री आणि हेअर ड्रायर गिफ्ट करण्यात आले आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...