आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Beauty Pageant For Inmates At Maximum Security Prison For Women In Brazil

ब्राझिलमध्ये कुख्यात महिला कैदींची ब्युटी कॉन्टेस्ट, सौंदर्य पाहातच राहिले लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रियो डी जेनेरिय- तुम्ही पाहात असलेले छायाचित्रे ब्राझिलमधील तलावेरा ब्रूस तुरुंगात कैद असलेल्या महिला कैदींची (फीमेल क्रिमिनल्स) आहेत. चोख सुरक्षाव्यवस्था असलेल्या या तुरुंगात नुकताच महिला कैदींचा मनमोहक ग्लॅमर पाहायला मिळाला. तुरूंग प्रशासनाने कैद्यांसाठी ब्युटी कॉन्टेस्टचे आयोजन केले होते. महिला कैदी रॅम्पवर उतरल्या होत्या.

ब्युटी कॉन्टेस्टमध्ये महिला कैदी वेगवेगळ्या ड्रेसेस व मेकअपमध्ये दिसल्या. कैद्यांचा मेकअप व हेअरस्टाइलसाठी वॉलेन्टियर्सची मदत घेण्यात आली होती. महिला कैदी मॉडेल्सप्रमाणे रॅम्पवर कॅटवॉक करत होत्या. इतकेच नव्हेतर वेगवेगळ्या पोझही देत होत्या.

कैद्यांनी गमावलेला आत्मविश्वास त्यांना परत मिळवून देणे, हा या कॉन्टेस्टमागील मूळ उद्देश आहे. या इव्हेंटला शहरातील विविध सेवाभावी संस्थांनी सहकार्य केले.

ब्राझिलच्या 'मिनिस्ट्री ऑफ जस्टिस'नुसार, देशात महिला कैदींच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 2000 ते 2014 या काळात ही वाढ झाल्याची दिसून आली आहे. 'ह्यूमन राइट वॉच'नुसार ब्राझिलमधील तुरुंग कैद्यांनी खचाखच भरले आहेत. 3 लाख 77 हजार कैदींची क्षमता असलेल्या तुरुंगांमध्ये सहा लाखांहुन जास्त कैदी शिक्षा भोगत आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्राझिलमधील तुरुंगातील महिला कैदींचे ब्यूटी कॉन्टेस्टचे फोटोज...