आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधी होती भानगड, पतीला संपवण्याच्या नादात तिने अख्ख्या सासरचा काढला काटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - मर्जीविरुद्ध लग्न झाल्याने नववधू इतकी नाराज झाली की तिने सासरच्या 15 मंडळींना ठार मारले. एवढेच नव्हे, तर तिच्या सासरचे 12 जण अजुनही रुगणालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 21 वर्षीय नववधू आसिया बिबी हिला अटक केली. 
 
पतीला ठार मारण्यासाठी टाकले दुधात विष
> स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील मुजफ्फरगड परिसरात बुधवारी हा प्रकार समोर आला आहे. 
> पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, आसिया नावाच्या एका नववधूने आपला पती अमजद अकरम याला ठार मारण्यासाठी दुधात विष टाकले होते. मात्र, ज्या दुधात विष होते ते पतीने पिलेच नाही. 
> यानंतर त्याच दुधापासून लस्सी तयार केली. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने अतिशय आनंदाने लस्सीचे ग्लास संपवले. पण एकापाठोपाठ एक सगळ्यांची तब्येत बिघडली. सर्वांना रुगणालयात दाखल करण्यात आले. 
> उपचार सुरू असतानाच 15 जणांचा मृत्यू झाला. तर उर्वरीत 12 जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे डॉक्टरांनी स्पष्ट केले. 
> पोलिसांनी आसियाला अटक करताच तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आसियाने सांगितल्याप्रमाणे, तिचे दुसऱ्या एका तरुणावर प्रेम होते. तरीही कुटुंबियांनी लग्नास नकार देऊन बळजबरी दुसरीकडे निकाह लावून दिला. 
> पोलिसांनी आसियाला अटक करून तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच, हत्याकांडमध्ये तिच्या प्रियकराचा हात असल्याच्या संशयावरून त्याला देखील अटक करण्यात आली. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आसिया आणि घटनास्थळाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...