आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचे मेकअप साहित्य वापरतो बेकहॅम ! कधी कधी तिचे मेकअपचे साहित्य वापरतो डेव्हिड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंग्लंडचा माजी फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमला त्याचे गुड लूक्स आणि शानदार फिजिकसाठी मागच्या वर्षी सेक्सिएस्ट मॅनचा पुरस्कार देण्यात आला होता. तो या किताबाचा दावेदारही होता. लूकसाठी आतुर असलेला बेकहॅक बरेच तास जिममध्ये घाम गाळतो. शिवाय तो वेगवेगळ्या प्रकारचे डाएटही घेतो. मात्र, नुकतेच त्याच्या पत्नीने सर्वांना चकित करणारा खुलासा केला आहे. डेव्हिड बेकहॅम आपल्या मेकअपचे साहित्य बऱ्याच वेळा वापरतो, असे पत्नी व्हिक्टोरियाने सांगितले.

व्हिक्टोरियाने आपल्या मेकअपचे नवे कलेक्शन लाँच करताना हे सिक्रेट सांगितले. व्हिक्टोरिया म्हणाली, ‘डेव्हिड माझ्या मेकअपचे काही साहित्य वापरतो. मी घराबाहेर जाते तेव्हा तो बऱ्याचदा माझ्या मेकअपचे साहित्य वापरत असतो. जेव्हापासून मला हे माहिती झाले तेव्हापासून मी यासाठी त्याला कधी कधी चिडवत असते. आम्हाला खूप मजा येते. डेव्हिडने माझे मेकअप वापरल्यामुळे मला काहीच अडचण नाही. कारण यामुळे तो आणखी सुंदर दिसतो.’ डेव्हिड बेकहॅमसुद्धा आपल्या पत्नीला मदत करत असतो. आधी गायक असलेली व्हिक्टोरिया आता फॅशन डिझायनर आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी व्हिक्टोरियाच्या फॅशन शोचा आनंद लुटताना डेव्हिड दिसला होता. या वेळी त्याची तिन्ही मुले आणि मुलगी सोबत होती.
सामाजिक जीवनातही बेकहॅक सक्रिय
डेव्हिड बेकहॅम सामाजिक जीवनातही सक्रिय आहे. त्याला अनेकदा फुटबॉलच्या मैदानावर किंवा बास्केटबॉल कोर्टवर खेळाचा आनंद लुटताना पाहण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तो पत्नीसोबत स्पोर्ट्स एजंट डेव्ह गार्डनरच्या पार्टीत झळकला होता. बेकहॅम आणि डेव्ह चांगले मित्र आहेत.
बातम्या आणखी आहेत...