आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीरियातील या शहराची अशी लागली आहे वाट, कधी इतके सुंदर होते हे शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सीरियातील अलेप्पो शहर... पूर्वी असे होते आणि आता असे उद्धवस्त झाले आहे. - Divya Marathi
सीरियातील अलेप्पो शहर... पूर्वी असे होते आणि आता असे उद्धवस्त झाले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- सीरिया 2011 पासून अंतर्गत युद्धाने त्रस्त आहे. मागील काही वर्षापासून सीरियात राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे सरकार आणि कट्टरपंथी संघटना ISIS यांच्यात सत्तासंघर्ष सुरु आहे व तेथे आतापर्यंत लाखो लोक मारले गेले आहेत. रशिया सरकार, सीरियाच्या मदतीसाठी आणि ISIS ला नेस्तनाबूत करण्यासाठी जबरदस्त मिसाईल हल्ले करत आहे. जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरही उरले नाहीत...
- अडीच लाख लोकसंख्येच्या अलेप्पो या शहरात मागील 8 दिवसात 800 हून अधिक हवाई हल्ले केले गेले आहेत.
- यात 400 हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांचे ढिगारेच्या ढिगारे पडले आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठीही डॉक्टरही उरले नाहीत.
- सीरियन सुरक्ष दल आणि रशियाने या शहरावर सातत्याने हवाई हल्ले व बॉम्बस्फोट केल्याने रूग्णालये, इमारती आणि अनेक महत्त्वाचे भाग जमिनदोस्त केले गेले आहेत.
अलेप्पोसाठी असद सरकार कोणत्याही पातळीवर जाण्यास तयार-

- अलेप्पोत मागील आठवड्यात सीमा रेषा तोडल्याने एकापाठोपाठ सातत्याने हल्ले केले जात आहेत.
- मोकळे रस्ते, जेथे माणसे सोडा, प्राणी किंवा पक्षीही नजरेत पडत नाहीत.
- आता जे थोडेपार लोक जिवंत राहिले आहेत ते उपासमारीने मरतील.
- तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अलेप्पो शहर सीरियन सरकारसाठी खूपच ‘उपयोगी’ भाग आहे. हे शहर ताब्यात घेण्यासाठी असद सरकार कोणत्याही पातळीवर उतरू शकते.
रशियाने दावा फेटाळला-
- यूकेच्या संस्थेने दावा केला आ की, सीरियात रशियाच्या हवाई हल्ल्यांनी मागील एका वर्षापासून 4 हजारांहून अधिक सामान्य नागरिक मारले गेले आहेत.
- या दरम्यान 2746 आयएस दहशतवादी आणि 2814 बंडखोर मारले गेले आहे.
- मात्र, रशियाने हा दावा साफ फेटाळून लावला आहे.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, अलेप्पो शहराचे मागील 5 वर्षापूर्वीचे आणि आता आताचे फोटोज, जे सीरियाची संघर्षाची स्थिती स्पष्ट करतात...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...