आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

50 वर्षांमध्ये एवढे बदलले सिंगापूर, पाहा पूर्वीचे आणि आताचे PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या 50 वर्षांमध्ये बदललेल्या सिंगापूरचे फोटो. - Divya Marathi
गेल्या 50 वर्षांमध्ये बदललेल्या सिंगापूरचे फोटो.
सिंगापूरमध्ये सर्वत्र स्वातंत्र्यांच्या पन्नाशीच्या निमित्ताने आनंदाने वातावरण आहे. 7 ते 10 ऑगस्टदरम्यान या ठिकाणी स्वातंत्र्याचा औपचारिक सोहळा होणार आहे. या दरम्यान परेडबरोबरच विविध फेस्टीव्हलचे आयोजनही करण्यात येणार आहे. 9 ऑग्सट 1965 मध्ये मलेशियापासून वेगळा झालेला हा बेटावरील एक छोटासा देश आहे. आकाराचा विचार करता लंडनपेक्षाही अर्धा आहे. पण जगातील पहिल्या पाच फाइनांशिअल हबपैकी एक आहे. 20 व्या शतकात सिंगापूरच्या विकासाची यशोगाथा सर्वात मोठी आहे. समुद्र किनाऱ्यावर वसलेल्या या छोट्याशा देशात गगनचुंबी इमारतींची गर्दी आहे. 55 लाख लोकसंख्या असलेला हा देश जगातील तिसरा सर्वाधिक जीडीपी असलेला देश आहे, असा त्यांचा दावा आहे. 1819 मध्ये ब्रिटीशांनी सिंगापूर वसवले होते.

एकेकाळी याठिकाणी शेकडो बोट असायच्या. सिटी सेंटरमध्ये क्लार्क क्वेचा नदीच्या किनाऱ्यावरील भाग हा सर्वाधिक गर्दी असलेला भाग असायचा. याच ठिकाणी लोकांच्या सामानाची डिलेव्हरी होत असते. आता मात्र याठिकाणी अत्यंत मोजक्या बोट आढळतात. तर क्लार्क क्वेचा परिसर आता रेस्तरॉ आणि पब शौकिनांसाठी ओळखला जातो. मात्र, अजूनबही पूर्वापास चालत आलेले व्यापार हाच या शहराच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. 1964 मधील मलेशियन ग्रँड प्रिक्स आणि आजची सिंगापूर ग्रँड प्रिक्समध्ये यातील फरक स्पष्ट जाणवतो.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सिंगापूरचे पूर्वीचे आणि सध्याचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...