आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध भीक मागताना अटक झाल्यानंतर सापडले घबाड, भिकारी बनला १० कोटींचा मालक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- बँक खात्यात तब्बल १० कोटी रुपये जमा असेल तर त्या खातेदाराला भिकारी म्हणावे तरी कसे? कुवेतमध्ये अशाच एका भिकाऱ्याला अवैधरीत्या भीक मागताना अटक करण्यात आली. मात्र, त्याच्या बँक खात्यात सुमारे ५ लाख कुवेती दिनार अर्थात १० कोटी रुपये असल्याचे पोलिसांना आढळून आले.

"अल राय' या कुवेती दैनिकाच्या वृत्तानुसार, सध्या पवित्र रमजानचा महिना सुरू आहे. विशेष करून या महिन्यात भीक मागण्यास कुवेत आणि अन्य सौदी राष्ट्रांमध्ये बंदी आहे. मात्र, कुवेत शहरातील एका चौकात पोलिसांना एक अनिवासी कुवेती भिकारी भीक मागत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी त्यास ताब्यात घेऊन अल अहमदी पोलिस ठाण्यात नेले. त्याची कसून चौकशी केली असता त्याच्या बँक खात्यात सुमारे ५ लाख कुवेती दिनार अर्थात १० कोटींपेक्षाही जास्त रक्कम असल्याचे आढळले.

८५ टक्के भिकारी परदेशातील
सौदीच्या सामाजिक व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौदी राष्ट्रांमध्ये भीक मागता येत नाही. मात्र, परदेशी नागरिकच येथे भीक मागताना मोठ्या प्रमाणात दिसतात. आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी ८५ टक्के भिकारी परदेशी असल्याचेही त्यांनी सांगितले. २०१२ मध्ये कुवेतच्या पोलिसांनी पत्नीला भीक मागण्यास प्रवृत्त करणाऱ्यास अटक केली होती.
बातम्या आणखी आहेत...