आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ यांच्या जागी निवडणूक लढवणार बेगमसाहिबा?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- नवाझ शरीफ यांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवल्यानंतर त्यांच्या मतदारसंघातून बेगमसाहिबा कुलसुम किंवा मुलगी मरयम यांना निवडणूक लढवावी लागणार आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होऊ शकतो, असे सत्ताधारी पीएमएल(एन) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
  
२८ जुलै रोजी न्यायालयाने शरीफ यांना अपात्र असल्याचा निकाल दिला होता. त्यानंतर त्यांचे धाकटे बंधू शाहबाज शरीफ यांच्या नावाची पक्षवर्तुळात चर्चा होती. परंतु आता ते नाव मागे पडले आहे. पंतप्रधानपदासाठी नैसर्गिक पसंती म्हणून पत्नी कुलसुम तसेच मरयमला महत्त्व आले आहे. पक्षातील अनेक नेत्यांचा कुलसुम यांच्यावर विश्वास आहे. त्यामुळे पहिली पसंती कुलसुम आहेत. दुसरा पर्याय म्हणून मरयम यांचे नाव चर्चेत आहे. शरीफ यांच्या एनए-१२० या लाहोरमधील मतदारसंघातून त्यांच्यापैकी कोण निवडणूक लढवेल, हे लवकरच स्पष्ट होईल. राजकीय शत्रू असलेले तेहरिक-ए-इन्साफन्या या मतदारसंघासाठी यास्मिन रशीद या उमेदवाराची घोषणा केली आहे.

निवडणूक आयोगाची नोटीस, पक्षाचे अध्यक्ष बदला  
सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी शरीफ यांना अपात्र ठरवले आहे. त्यानंतर शरीफ यांना पंतप्रधानपद सोडावे लागले होते.  त्यांनी पक्षाचे अध्यक्षपद मात्र सोडले नव्हते. आतापर्यंत तेच प्रमुख आहेत. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षपदावर इतर व्यक्तीची निवड करण्याची सूचना पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) या सत्ताधारी पक्षाला केली आहे. शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज यांच्याकडे ही धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.  
बातम्या आणखी आहेत...