आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारगिल युध्‍द झाले नसते, बेनझीर भुट्टोंनी मुशर्रफ यांच्या कारवाईस दिला होता नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद - पाकिस्तान लष्‍कराने 1999 मध्‍ये कारगिलमध्‍ये घुसखोरीची योजना फार पूर्वीपासून तयार केली होती. तत्कालीन पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा लष्‍कराच्या योजनेला विरोध होता. त्यामुळे त्यांनी लष्‍करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांना कारवाईची मंजुरी दिली नाही. भारताचे माजी परराष्‍ट्र अधिकारी राजीव डोगरा यांनी 'व्हेअर बॉर्डर्स ब्लीड : अॅन इनसाइडर्स अकाउंट ऑफ इंडो-पाक रिलेशन्स' या नव्या पुस्तकात हा खुलासा केला आहे. कारगिल युध्‍दाच्या वेळी नवाज शरीफ यांचे सरकार होते.
डोगरा यांनी आपल्या पुस्तकात भारत-पाकिस्तान संबंधांचे मागील 70 वर्षांतील ऐतिहासिक, राजकीय आणि लष्‍कर याबाबत चर्चा केली आहे. बेनझीर यांच्याविषय ते म्हणतात, की त्या उदारमतवादी होत्या. त्यांना पाश्‍चात्य शिक्षणाचा इतर देशांशी चांगले संबंध ठेवायला मदत झाली. निकृष्‍ट दर्जाच्या गुप्त योजनांनी त्या प्रभावित होत्या. परंतु, लष्‍कराच्या योजनेला त्यांनी वेळेवर विरोध केला. बेनझीर यांच्या या निर्णयामुळे कारगिलवरील हल्ला टाळता आला असता, असे डोगरा लिहिले आहे.

बेनझीर यांनी मुशर्रफ यांना दोन शब्द सुनावले
बेनझीर यांच्या मुलाखतीच्या आधारावर डोगरा यांनी म्हटले आहे की, तत्कालीन पंतप्रधानांनी लष्‍करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांची योजना खारीज केली होती. त्यावेळी मुशर्रफ डायरेक्टर जनरल ऑफ मिल‍िट्री ऑपरेशन्स या पदावर होते. त्यांनी युध्‍द जिंकून श्रीनगरवर ताबा मिळवायचा, असे बेनझीर यांना सांगितले होते. यावर बेनझीर म्हणाल्या, जनरल नको, जर भारताने आपल्याला श्रीनगरमधून निघा असा आदेश दिला, तर आपल्याला स्वातंत्र काश्‍मीरही सोडावे लागेल. कारण संयुक्त राष्‍ट्राच्या प्रस्तावानुसार जनमत बनवणे महत्त्वाचे आहे. डोगरा पुस्तकात पुढे लिहितात, 1993 मधील मुंबई बॉम्बस्फोटाची माहिती आताचे पाकिस्तान पंतप्रधान नवाज शरीफ यांना होती. भारताच्या फाळणीसह लॉर्ड माउंटबॅटन, मोहम्मद अली जिना, अटलबिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांचाही उल्लेख पुस्तकात आहे.

कोण आहेत राजीव?
राजीव डोगरा 1992 ते 1994 पर्यंत कराची कौन्सूल जनरल होते. ते 1974 च्या बॅचे भारतीय परराष्‍ट्र सेवेचे अधिकारी आहेत. त्यांनी इटली, रोमानिया, अल्बानिया आणि सॅन मरिनोमध्‍ये राजदूत म्हणून काम केले आहे. या व्यतिरिक्त डोगरा हे संयुक्त राष्‍ट्रात भारताचे प्रतिनिधीही होते.