आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेनझीर भुट्टो : 35 व्या वर्षी बनल्या होत्या PM, मुस्लीम देशातील सर्वात तरुण नेत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो. - Divya Marathi
फाइल फोटो : पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो.
इंटरनॅशनल डेस्क - 18 ऑक्टोबर 2007 मध्ये आठ वर्षाच्या निर्वासनानंतर बेनझीर भुट्टो मायदेशी पाकिस्तानात परतल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या ताफ्याजवळ एका आत्मघातकी हल्लेखोराने स्फोट घडवला होता. या स्फोटात 20 पोलिस अधिकाऱ्यांसह सुमारे 160 जण ठार झाले होते. भुट्टो मात्र या हल्ल्यात बचावल्या होत्या. मात्र त्यानंतर दोन महिन्यांनीच एका निवडणूक प्रचार सभेत त्यांच्यावर हल्ला झाला त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

दोन वेळा बनल्या पंतप्रधान
1988-90 आणि 1993-96 मध्ये भुट्टो दोन वेळा पंतप्रधान बनल्या. 2007 मध्ये पाकिस्तानात जेव्हा पाकिस्तानात लोकशाहीसाठी आंदोलन सुरू झाले होते, त्यावेळी भुट्टो आठ वर्षांनंतर देशात परतल्या होत्या. मुशर्रफ सरकारने त्यांना परतण्यास परवानगी दिली होती. मात्र त्यांच्यावर हल्ल्यची शक्यता वर्तवण्यात आली होती. बेनझील यांनी दुबईहून कराचीला उड्डाण घेण्यापूर्वी म्हटले होते की, मला वाटते सर्वात मोठा रक्षक ईश्वर असतो त्याने ठरवले तर सर्वकाही ठीक होईल.

मुस्लिम देशांतील सर्वात तरुण नेत्या
अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात शिकलेल्या भुट्टो वयाच्या अवघ्या 35 व्या वर्षी एखाद्या मुस्लिम देशाच्या पंतप्रधान बनल्या होत्या. भुट्टो यांना नेहमी अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. एवढेच नाही तर 1989 मध्ये त्यांनी व्हाइट हाउसमध्येही पाहुणचार स्वीकारला होता. त्यांनी 1987 मध्ये आसीफ अली झरदारी यांच्याशी विवाह केला होता. झरदारी तेव्हा नॅशनल असेंबलीचे सदस्य होते. झरदारी त्यांच्या पत्नीच्या दुसऱ्या कार्यकाळात पर्यावरण मंत्री पदावर होते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, बेनझीर यांचे काही Unseen Pics...