आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिलरींना मतदान करणार : सँडर्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - सिनेटर बर्नी सँडर्स यांनी डेमोक्रॅटिक पार्टीतील आपल्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना मतदान करणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. नोव्हेंबरमधील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे.

नोव्हेंबरमधील निवडणुकीत हिलरी यांना मतदान करणार का, या प्रश्नावर सँडर्स यांनी ‘येस, येस ’ असे उत्तर दिले. एका मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका जाहीर केली. वास्तविक राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत क्लिंटन यांच्याशी त्यांची चुरशीची लढत दिली होती. त्यानंतर सँडर्स यांनी देशाच्या उभारणीसाठी क्लिंटन यांना आपला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांना पराभूत करण्यासाठी वाटेल ती करण्याची माझी तयारी आहे. सर्वार्थाने ट्रम्प हे देशासाठी संकटासारखे आहेत. ते निवडून येणार असतील तर हा धोका ठरू शकतो. देशाची विभागणी करणारा व्यक्ती राष्ट्राध्यक्ष म्हणून आपल्याला नको.

डेमोक्रॅटिक पार्टीच जनतेचा पक्ष : डेमोक्रॅटिक पार्टी हीच जनतेच्या समस्यांची सोडवणूक करण्यात सक्षम आहे. त्यामुळे जनतेचे खरे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष म्हणून डेमोक्रॅटिकची आेळख आहे. देशासमोर अनेक प्रश्न आहेत. लाखो रोजगार निर्मितीचे आव्हान आहे. वातावरण बदलाची समस्याही आहे. ती सोडवण्यासाठी समर्थपणे काम करणे गरजेचे आहे. त्याचे भान राष्ट्राध्यक्ष पदावरील व्यक्तीला असली पाहिजे, असे सँडर्स यांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...