नॅशनल जिऑग्राफी मॅगझिनतर्फे दरवर्षी जगभरातील फोटोग्राफर्ससाठी खास स्पर्धेचे आयोजन केले जात असते. यामध्ये विविध कॅटॅगरीसाठी स्पर्धा आयोजित केली जाते. त्यात ट्रॅव्हर हीदेखिल एक कॅटेगरी असते. जगभरात पर्यटन करून काही फोटोग्राफर खास या स्पर्धेसाठी फोटो काढत असतात. जगभरातील पर्यटनस्थळे, विविध देशांमधील वैशिष्ट्ये, त्याठिकाणचे आकर्षण असलेल्या बाबी यांचे फोटो या कॅटेगरीसाठी पाठवले जातात. यंदाही अशा प्रकारच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 19 ऑगस्टच्या वर्ल्ड फोटोग्राफी डेच्या निमित्ताने ट्रॅव्हल कॅटेगरीमध्ये यंदा फोटोग्राफर्सने पाठवलेले फोटो खास आपल्यासाठी याठिकाणी देत आहोत.
पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच एकापेक्षा एक सुंदर फोटो...