आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: भेट द्या पर्यटकांनी निवड केलेल्या जगातील बेस्ट रिसॉर्टला, निळ्याशार पाण्यात हरखून जा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ट्रॅव्हलर वेबसाईट ट्रिप अॅडव्हायझरवर झालेल्या एका व्होटिंगमध्ये मालदिवच्या एका रिसॉर्टची 2015 चे बेस्ट रिसॉर्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. या रिसॉर्टचे नाव गिली लंकंनफुशी असे आहे. येथे समुद्राच्या पाण्यावर 45 व्हिलाज तयार करण्यात आले आहेत. एक दिवस आणि रात्र थांबण्याचे एका व्हिलाचे भाडे तब्बल 64 हजार रुपये आहे. या व्हिलाजमध्ये नौकेच्या मदतीने जावे लागते.
या रिसॉर्टचे व्हिलाज अगदी स्वर्गासम असल्याचे अनेक पर्यटकांनी सांगितले आहे. व्हिलाजच्या आजूबाजूला असलेले पाणी स्वच्छ आणि खुप सुंदर आहे. ट्रेडिशनल आणि सस्टेनेबल मटेरिअलच्या मदतीने या व्हिलाजचे बांधकाम करण्यात आले आहे. प्रत्येक व्हिलावर सनडेक, छत, सेपरेट बाथरुम बनवण्यात आले आहेत. येथे अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. या परिसरात एक सिनेमा थिअटरही आहे. त्यात आठड्यातून दोन दिवस चित्रपट दाखवला जातो. स्पोर्ट्सच्या सुविधाही येथे उपलब्ध आहेत. जगभरातील पर्यटकांचे हे आवडते स्थळ आहे. येथील शांतता आणि समुद्राचे निळेशार पाणी अगदी वेड लावते. हनिमुन साजरा करायला आलेल्या जोडण्यांसाठी ही एक पर्वणीच ठरते.
पुढील स्लाईडवर बघा, या रिसॉर्टमधील व्हिलाजचा व्हिडिओ... आणि फोटो....