आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐतिहासिक करार: भारत-अमेरिका परस्परांचे लष्करी तळ वापरू शकणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- भारत-अमेरिका यांच्यात परस्परांच्या लष्करी तळांचा वापर करण्याच्या करारावर सहमती झाली आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर त्यांचे समकक्ष अॅश्टन कार्टर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबतची संयुक्त घोषणा केली. भारताच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा करार मानला जात आहे.

१० वर्षांच्या मंथनानंतर हा करार झाला आहे. त्यानुसार दोन्ही देशांत सामरिक, प्रादेशिक सहकार्य, संरक्षण तंत्रज्ञानाचीही देवाणघेवाण केली जाणार आहे. करारावर स्वाक्षरी झााली अाहे. भारतात अमेरिकेचा एकही लष्करी तळ नाही. परंतु अमेरिका आता लष्करी तळाचा वापर करू शकते. त्यानुसार दोन्ही देश परस्परांच्या बंदरांना भेटी देऊ शकतील. संयुक्त लष्करी सराव आयोजित करतील. इंधन भरण्यासाठीही परस्परांना वारंवार परवानगीची गरज भासणार नाही. नैसर्गिक आपत्तीच्या काळात दोन्ही देश तळांचा वापर करून मदत करू शकतील. पाकिस्तानशी सलगी करून भारताला कायम घेरण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या चीनची या करारामुळे रणनीतीच्या पातळीवर चांगलीच कोंडी होणार आहे. परराष्ट्र क्षेत्रातील पन्नास वर्षांतील ही सर्वात मोठी कामगिरी आहे.

सीमेपलीकडून काही शक्तीच संवेदनशील पेटलेल्या, होरपळलेल्या काश्मीरला जाणूनबुजून अशांत ठेवत आहेत, असा आरोप सरंक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पाकिस्तानचा उल्लेख करता केला. ते म्हणाले, अत्यंत कमी टक्के लोकांनी हा उत्पात घडवला. सरकारने स्वत:हून पुढाकार घेऊन हिंसेवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नरत आहे. काश्मिरात संचारबंदी जवळपास संपूर्णपणे उठविली आहे. सर्वपक्षीय संयुक्त शिष्टमंडळदेखील काश्मिरात पाठविले आहे. काश्मिरात लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार आहे. स्थिती सुधारू लागली आहे.

संरक्षणातील भागीदार
अमेरिकागेल्या दहा वर्षांपासून भारतासोबत लष्करी भागीदारी करण्याच्या प्रयत्नात होती. त्यानुसार दोन्ही देशांत चार समझोते होणार आहेत. आता आणखी दोन करार होणे बाकी आहेत. आता भारत अमेरिकेचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार बनला आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, पाक-चीनची अस्वस्थता... पाकलाही सुनावले....
बातम्या आणखी आहेत...