आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुवनेश्वरच्या लग्नात सचिन, गावस्करसह यांना निमंत्रण, अशी आहे पाहुण्यांची यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमारच्या लग्नाच्या तयारीला वेग आला आहे. लग्नाच्या निमंत्रण पत्रिका देखील छापून आल्या असून त्या वाटण्याचे काम सध्या सुरू आहे. भुवनेश्वरची बहिण रेखा अधाना आणि वडील किरणपाल सिंह यांनी पाहुण्यांची यादी जारी केली आहे. त्यांनी श्रीलंकेच्या अख्ख्या टीमला आमंत्रित केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, भुवीचे लग्न भारत-श्रीलंका सिरीज सुरू असतानाच 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 
 
21 नोव्हेंबर रोजी मेरठ पोहोचणार भुवी
> किरणपाल यांनी सांगितल्याप्रमाणे, "भुवी श्रीलंका विरुद्ध टेस्ट सिरीजमध्ये व्यस्त आहे. तो कोलकाता येथे टेस्ट सिरीज संपताच 21 नोव्हेंबर रोजी मेरठला पोहोचणार आहे. एक टेस्ट मॅच दिल्लीत देखील आहे. जो 2 ते 6 डिसेंबर दरम्यान खेळला जाणार आहे. याच टेस्ट दरम्यान भुवीचे ग्रॅन्ड रिसेप्शन पार पडणार आहे."
> भुवनेश्वरचा विवाह 23 नोव्हेंबर रोजी मेरठमध्ये होणार आहे. एक रिसेप्शन त्याच्या बुलंदशहर येथील वडिलोपार्जित घराजवळही होणार आहे. हा रिसेप्शन सोहळा 26 नोव्हेंबरला पार पडणार आहे. तर दुसरे रिसेप्शन डिसेंबरमध्ये होणार आहे."
> भुवनेश्वरच्या बहिणीने सांगितल्याप्रमाणे, "आम्ही श्रीलंकेच्या क्रिकेट टीमसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि लिटल मास्टर सुनील गावसकरला सुद्धा निमंत्रण पाठवले आहे. हा रिसेप्शन ताज हॉटेलमध्ये पार पडणार आहे. त्याच ठिकाणी दोन्ही टीम थांबणार आहेत. मेंदी आणि लेडीज संगीत असे कार्यक्रम मीच आयोजित करत आहे."
 
पुढील स्लाइड्सवर फोटोजमध्ये पाहा, आणखी काही माहिती... 
बातम्या आणखी आहेत...