आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडएवढ्या जमिनीची विक्री !, भटक्या जमातीसह एकूण १५० जणांचे वस्तीस्थान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडनी - पृथ्वीवरील हा बहुदा सर्वात मोठा सौदा ठरेल. राजघराण्याचा यावर अधिकार नाही. कोणत्याही राज्याचादेखील नाही. ही जमीन पूर्णपणे खासगी मालमत्ता आहे. जमिनीची किंमत सुमारे २ हजार ८० कोटी रुपये (३२ कोटी डॉलर्स) आहे. ऑस्ट्रेलियातील हा भूखंड संपूर्ण इंग्लंडच्या क्षेत्रफळाइतका आहे.

२३ हजार चौरस किलोमीटर आकाराचा हा महाभूखंड आहे. सध्या जमिनीवर पशुपालन करणारे लोक राहतात. त्यांची संख्या १५० आहे. त्यांच्याशिवाय काही प्राणी आहेत. ही जमीन सिडनीच्या किडमन कुटुंबाकडे १०० हून अधिक वर्षांपासून आहे. किडमन यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती व ते घरून पळून आले होते. त्यानंतर ते देशातील सर्वात मोठे धर्मगुरू बनले होते. आता जमिनीसाठी जगभरातून ३० लोकांनी बोली लावली आहे. त्यापैकीच एकाला ही जमीन दिली जाणार आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये क्विन्सलँडच्या उत्तरेकडील दुर्गम भागात ही जमीन आहे. त्या जमिनीची आेळख पटवणे हे तितकेसे सोपे काम नाही. तेथे पोहोचण्यासाठी विमानाची मदत घ्यावी लागते. संपूर्ण जमिनीला फेरफटका मारण्यासाठी किमान आठ दिवस एवढा कालावधी लागतो. जमिनीचे संरक्षण सध्या एस. किडमन अँड कंपनीकडे आहे. कंपनीची स्थापना १८९९ मध्ये झाली होती. किडमन कुटुंबाकडे या नॉन लिस्टेड कंपनीचे ९८ टक्के शेअर आहेत. ते ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे जमीनदार ठरतात. याच वर्षी किडमन यांच्याकडून ही जमीन विकण्याची इच्छा एप्रिलमध्ये जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर विक्रीसाठीचे प्रस्ताव माग‌वण्यात आले होते. त्यात चीन, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, स्वित्झर्लंड, दक्षिण अमेरिका, इंडोनेशियापर्यंत अनेक देशांतून बोली लावण्यात आली. बोली लावणारे निम्मे लोक ऑस्ट्रेलियातील आहेत.

जमिनीचे वाढते दर आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असल्यामुळेच या संपत्तीचा सौदा अधिक चर्चेत आला. दुसरीकडे जमीन विकण्यास किडमन कुटुंब इच्छुक नाही, अशी अफवादेखील सुरू होती. परंतु सौद्याचे एजंट डॉन मॅनिफोल्ड यांच्या मते, जमीन विकण्यास कुटुंब तयार आहे. अशा प्रकारच्या गोष्टींशी लोक जिव्हाळ्याने जोडलेले असतात. पाच पिढ्यांपासून किडमन कुटुंब कोणत्याही व्याजाशिवाय यशस्वीपणे या जमिनीचा यशस्वीपणे सांभाळ करत आहे.
बातम्या आणखी आहेत...