आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रिटनमध्ये सर्वात मोठा समुदाय भारतीय, संख्येत गेल्या वर्षी पन्नास टक्क्यांनी वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये स्थलांतरित परदेशींची संख्या मोठी आहे. त्यात सर्वाधिक स्थलांतरितांमध्ये चीनचा पहिला क्रमांक लागतो. त्यानंतर भारत दुसऱ्या स्थानी आहे. अलीकडे सरकारच्या वतीने ही माहिती जाहीर करण्यात आली.

२०१३ मध्ये ४६ हजार चिनी नागरिक ब्रिटनमध्ये दाखल झाले होते. शिक्षण, नोकरीच्या कारणासाठी स्थलांतर केले जाते. त्याचवर्षी ३३ हजार भारतीय ब्रिटनमध्ये आले होते. भारताबरोबरच स्पेनचे देखील सुमारे ३३ हजार नागरिक ब्रिटनमध्ये राहतात. राष्ट्रीय सांख्यिकी व आंतरराष्ट्रीय प्रवासी विभागाच्या वतीने हा दावा करण्यात आला. दुसरीकडे कामाच्या निमित्ताने बाहेर गेलेले ब्रिटनचे नागरिक गेल्या वर्षी परतले आहेत. त्यांची संख्या ४६ हजारांवर आहे. वास्तविक स्थलांतराच्या क्षेत्रात ब्रिटनमध्ये या संख्येत एवढी मोठी तफावत दिसून येत नाही. परंतु गेल्या वर्षी त्यात मोठे अंतर दिसून आले.
गेल्या वर्षी देशातील स्थलांतरितांची एकूण संख्या ६ लाख ४१ हजारांवर पोहाेचली. त्यात पन्नास टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्थलांतर विभागाच्या वतीने सांगण्यात आले. २०१३ मध्ये ही संख्या ३ लाख १८ हजार एवढी होती.
बातम्या आणखी आहेत...