आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडमध्ये महाराणीसाठी बाइक फॉर मॉम कॅम्पेन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये प्रिन्स महा वेज्रालोंगक्रोन यांनी आपली आई व महाराणी सिरकित यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित "बाइक फॉर मॉम' कॅम्पेनमध्ये सर्वसामान्य लोकांसोबत सहभागी हाेऊन सायकल चालवली. महाराणींच्या जन्मदिनानिमित्त सुरू करण्यात आलेल्या "बाइक फॉर मॉम' कॅम्पेनमध्ये पहिल्यांदाच बाइक राइडचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हजारो लोकांनी निळ्या रंगाचे कपडे परिधान करून २७ मैलांपर्यंत सायकल चालवली.
प्रिन्समुळे उत्साह
देशात सार्वजनिक पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच उत्सवात प्रिन्स महा वेज्रालोंगक्रोन सहभागी झाल्याने लोकांचा उत्साह वाढला. प्रिन्सदेखील निळ्या वेशात सायकलस्वाराच्या पावित्र्यात सहभागी झाले. या बाइक राइडसाठी देशभरात तीन लाख लोकांनी नावनोंदणी केली होती. प्रिन्सव्यतिरिक्त थायलंडचे पंतप्रधान तसेच अनेक मंत्री सहभागी होते.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..