आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना संपत्ती देणार नाही, या निर्णयाबद्दल बिल गेट्स यांना गर्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- बिल गेट्स नावाची व्यक्ती माहीत नसेल अशी व्यक्ती विरळाच. त्यांनी २८ ऑक्टोबरला वाढदिवस साजरा केला. अलीकडेच त्यांनी एका मुलाखतीत वक्तव्य देऊन सर्वांनाच चकित केले. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या ७० अब्ज पौंडांच्या संपत्तीतून (५ लाख कोटींहून जास्त) माझ्या मुलांना काहीच मिळणार नाही.

गेट्स यांच्यानुसार, आपले वडील आपली ७० अब्ज पौंडांची संपत्ती दान करू इच्छितात याची माहिती माझ्या दोन्ही मुली आणि एक मुलगा यांना आहे. जगातील गरिबांना आपला पैसा दान करण्याच्या माझ्या निर्णयाबद्दल त्यांना गर्व आहे. मी मुलांना शिक्षण दिले आहे, ते आपले करिअर स्वत: सुरू करू शकतात. संपत्ती दान केल्यानंतरही मी आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असेल. मी कधीही गरीब होणार नाही. मृत्यूनंतर आपली संपत्ती चॅरिटीत का देऊ इच्छित आहेत यामागील भूमिका माझ्या मुलांना माहीत आहे.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक म्हणाले की, माझ्या मुलांनी चांगले शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे थोडा पैसाही आहे. त्यामुळे ते गरीब नाहीत. ते आपले करिअर स्वत: सुरू शकतात. गेट्स आणि त्यांची पत्नी मिलिंडा गेट्स यांना तीन मुले आहेत. जेनिफर (२०), रॉरी (१७) आणि फोएबे (१४). जेनिफर कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला आहे. तेथे तिच्या पित्याने त्यांच्या नावे संगणकशास्त्र इमारत उभारण्यासाठी दशलक्ष पौंड दिले आहेत. इतर दोन्ही मुले सध्या शाळेत शिकतात. सध्या ते आई-वडिलांसोबत वॉशिंग्टनच्या घरात राहतात.
गेट्स आपल्या मुलांना त्यांच्या विशाल संपत्तीतून एक भाग देणार आहेत. उर्वरित संपत्ती ते बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनला दान देणार आहेत. फाउंडेशन संपूर्ण जगभर आरोग्य आणि शिक्षण प्रकल्प चालवते. गेट्स म्हणाले की, हे पैसे गरिबांच्या मदतीसाठी आहेत. मुलांना हे चांगले माहीत आहे, त्यांना आमचा अभिमान आहे. ते आमच्यासोबत सहलीला जातात, आम्ही केलेली कामे पाहतात. आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी पडावा म्हणून माझ्या संपत्तीचा एक अल्प भाग मुलांसाठी राखून ठेवला आहे. गेट्स जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेतच, शिवाय दानशूर असल्याने सर्वांना परिचित आहेत.
बातम्या आणखी आहेत...