आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताला \'विशेष सहकारी’ देशाचा दर्जा नाहीच, US संसदेत विधेयक फेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- व्यूहात्मक व संरक्षण क्षेत्रातील जागतिक भागीदार म्हणून भारताला विशेष दर्जा देण्यासंबंधीचे विधेयक अमेरिकी सिनेटने बुधवारी फेटाळले. विशेष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी संसदेत झालेल्या भाषणानंतर दुसऱ्याच दिवशी हे विधेयक फेटाळले गेल्याने भारताच्या प्रयत्नांना एक प्रकारे फटका बसला.

रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते जॉन मॅकेन यांनी अमेरिकेतील संरक्षणविषयक कायद्यामध्ये (नॅशनल डिफेन्स अॅथाॅरायझेशन अॅक्ट- एनडीएए १७) दुरुस्ती सुचवली होती. हा दुरुस्ती प्रस्ताव पारित झाला असता तर व्यूहात्मक व संरक्षणात्मक क्षेत्रातील जागतिक भागीदार देश म्हणून अमेरिकेकडून भारताला हा दर्जा मिळणार होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीत झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेने भारताला संरक्षण क्षेत्रातील प्रमुख भागीदार म्हणून दर्जा दिला होता. यामुळे अमेरिकेच्या निकटवर्तीय मित्रराष्ट्रांना पुरवल्या जाणाऱ्या संरक्षणविषयक तंत्रज्ञान व इतर साहित्याच्या व्यापारात भारत पात्र देश ठरला होता.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)